वाढती महागाई= सामान्यांच्या जगण्यावरील घाव



 ^^महागाईची ज्वाला रोज नवी पेटते;

घामाच्या किमतीला दाम कुठे भेटते.

कमाई तीच पण खर्च मात्र वाढतो;

सामान्य माणूस रोज चिंता करत करत जगतो!^^

आजच्या काळात वाढती महागाई हा सर्वसामान्य जनतेसमोरील गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढताना दिसतआहेत.धान्य; भाजीपाला;तेल; गॅस; पेट्रोल यांचे भाव आकाशाला भिडले आहेत.उत्पन्न मात्र तेवढेच राहिल्याने नागरिकांचे बजेट कोलमडत आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबाचे जगणे अधिक कठीण झाले आहे. घर चालवताना प्रत्येक पैशाचा हिशोब करावा लागत आहे. महागाईमुळे बचत करणे जवळपास अशक्य झाले आहे.शिक्षण आरोग्य आणि प्रवास खर्चही वाढले आहेत. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे अवघड झाले आहे.लहान मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होताना दिसतो.

कष्टकरी वर्ग दिवस-रात्र मेहनत करूनही त्रस्त आहे.महागाईमुळे मानसिक ताण तणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर सामाजिक आर्थिक विषमता मोठ्यप्रमाणावर वाढत आहे.श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होतानाचे चित्र सध्या समाजामध्ये पहावयास मिळत आहे.

या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला असता शासनाने महागाईवर नियंत्रण ठेवणे ही मोठी काळाची गरज बनली आहे. त्याकरिता आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही अतिशय महत्त्वाचे आहे. 

काळाबाजार आणि साठे बाजार कठोर कारवाई करण्यात यावी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगाराच्या संधी वाढविल्या गेल्या पाहिजेत. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. कारण सध्या समाजामध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आणि त्यातून तरुण पिढी ही वाम मार्गाला लागल्याचे चित्र सध्या समाजामध्ये दिसून येत आहे आणि ही बाब अतिशय खेदाची व मनाला न पटणारी अशी आहे. म्हणून माझ्या मते शासनाने सामान्य जनतेला दिलासा मिळेल अशा प्रकारचे निर्णय घेणे अतिशय गरजेचे आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळया बाजारावर अनिर्बंध अतिशय महत्त्वाचे आहे.

 माझ्या मते^ जनतेने आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये काटकसरीची सवय लावून घेणे नितांत आवश्यक आहे. अनावश्यक खर्च ही काळाची गरज होऊन बसली आहे. आपल्या जवळील काबाड कष्टाने मिळविलेल्या संपत्तीचा उपयोग योग्य त्या कारणासाठीच केला पाहिजे. अनावश्यक बाबी टाळून आवश्यक बाबीवरच खर्च झाला पाहिजे. नाहीतर ^^असल्यावर भसा भसा आणि नसल्यावर उपाशी बसा^^

आपली अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. तसे होऊ नये म्हणून मी पोट तिडकीने माझ्या सर्व बंधू-भगिनींना नम्रपणे सूचित करू इच्छितो की^वाढत्या महागाईच्या काळामध्ये आपण सर्वांनी अंग मेहनतीने मिळविलेल्या संपत्तीचा उपयोग आवश्यक बाबीसाठीच खर्च करावा .अनावश्यक बाबीवरील खर्च टाळावा. असे माझे प्रामाणिक मत आहे^

. त्यानंतर यामध्ये संकटाच्या काळात ^संयम ^आणि ^नियोजन^ या दोन गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाचे आहे. आ गया आर्थिक नव्हे तर सामाजिक प्रश्न होऊन बसलेला आहे. शासनाने वेळीच उपाय केले तर जनतेला दिलासा निश्चितच मिळेल.असेही माझी प्रामाणिक मत आहे. नाहीतर सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सर्व बारीक-सारीक बाबींचा शासनाने विचार करून महागाई च्या संदर्भात वेळीच नियोजन करून महागाई आटोक्यात आणावी. असे केले तरच या महागाईच्या विळख्यात सापडलेली सर्वसामान्य जनता ही काही प्रमाणात का होईना स्थिर स्थावर झाल्याशिवाय राहणार नाही असे माझे प्रामाणिक मतआहे.

 . म्हणून या वाटते महाराजांच्या संदर्भात मी असे म्हणू इच्छितो की

^^महागाईने जनता त्रस्त;

जेवण झाले फारच कष्ट.

हातात पैसा पडतो कमी;

सुखाची वाट पाहतो आम्ही.!!


प्रा.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे

(पोलीस क्राईम न्यूज ब्युरो चीफ)

साकुरी. ता.राहता. जिल्हा. अहिल्या नगर 

मो. ९६०४७९७३१६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या