बारावीच्या परीक्षेचा निकाल लागताच मनावरचा कमी होणारा ताण आणि यश मिळाल्याचा आनंद होतो.
जन गण मन कनिष्ठ महाविद्यालयाचा ९९.६८% नी निकाल लागला तर काही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
शास्त्र विभागातून लावण्य युवराज तळेले या विद्यार्थ्याने ९२.१७% प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला तर अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक निशांत ओंकार पाटील ८४.८३%, तर वंश बिपीन ठक्कर ८२.८३% प्राप्त केले.
वाणिज्य शाखेतून अनुक्रमे प्रीतम गौतम दुआ ८८.१७% , पीयुष उत्तम दुआ ८७.८३% तर पार्थ चोणकर ८४.८३% या विद्यार्थांनी आपले स्थान पक्के केले.
कला शाखेमधून अनुक्रमे रणधीर सोनकर ७२.१७% , अवनीश पटवर्धन ७१.८३% तर तन्वी म्हात्रे ७१.८३% प्राप्त केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व उत्तीर्ण आणि उच्च श्रेणी मधून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.शालेय जीवनापासून प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वासाने मात करत बारावीचा टप्पा देखील आपण सर्वांनी प्रयत्नाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण केला, बारावीचा हा टप्पा आयुष्याला आणि भविष्याला कलाटणी देणारा टप्पा आहे, तुमचे भवितव्य तुमच्या हातात आहे , योग्य निर्णयाने भविष्याला आपल्या जवळ करा आणि यशाची शिखरे पादाक्रांत करा ,असा अमूल्य सल्ला संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना दिला ,तर स्वप्न केवळ बघून मोठी होत नसतात तर झटून मोठी होतात म्हणूनच यश मिळाले म्हणून इथेच न थांबता झटून कामाला लागा आणि स्वप्नांचा पाठपुरावा करा, असे संस्थापिका सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले व सर्वांचे कौतुक केले.
सर्व शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे फलस्वरूप म्हणजे आजच्या ज्युनिअर कॉलेजचा सर्वोत्तम निकाल. प्रभारी प्राचार्य श्री.अल्पेश खोब्रागडे सर आणि उपप्राचार्य श्री.एकनाथ चौधरी सर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.संपूर्ण विदयासमूहाकडून यशस्वी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.*

0 टिप्पण्या