राष्ट्रीय शिक्षण संस्था,रेझिंग ए मॅथेमॅटिशियन फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवल सिटी यांच्या संयुक्त विद्यामाने शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित विषयासंबंधित मॅथ्स सर्कल या उपक्रमाचा समारोप आज शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी संस्थेच्या डॉ.हेडगेवार सभागृहामध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी चे अध्यक्ष श्री. प्रसाद खोत हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष डॉ श्री.संजय कुलकर्णी व मॅथ्स सर्कल उपक्रम समन्वयक व संस्था उपाध्यक्षा डॉ. सौ.सरोज कुलकर्णी, रेझिंग ए मॅथेमॅटिशियन फाउंडेशन च्या सौ. वृषाली नायर, रोटरीचे प्रकल्प समन्वयक श्री. संतोष नंबुदिरी यांसह रोटरी व रॅम चे सदस्य , संस्था पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष डॉ.श्री.संजय कुलकर्णी यांनी केले. यामध्ये मॅथ्स सर्कल या उपक्रमाची संकल्पना रेझिंग अ मॅथेमॅटिशन चे श्री.विनय नायर यांच्या संपर्कामुळे महाराष्ट्रात प्रथमच आपल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने सुरू केली. गेली तीन वर्ष हा उपक्रम सुरू आहे.या उपक्रमाचे सर्व व्यवस्थापन संस्था उपाध्यक्षा डॉ. सौ. सरोज कुलकर्णी बघतात .यातून पुढे येणारे विद्यार्थी हे नक्कीच स्वतःच्या क्षेत्रामध्ये नाव कमवतील. रोटरी क्लबच्या मदतीमुळे डोंबिवलीमध्ये ही संधी आमच्या संस्थेला उपलब्ध करून देता आली, म्हणून रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. या विद्यार्थ्यांना मॅथ्स सर्कल हा उपक्रम फायदेशीर ठरेल .गणितातील एखादी समस्या चार ते पाच मार्गाने सोडवता येते असे म्हटले.तर विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी आणणे व तेवढा वेळ थांबणे यासाठी पालकांनी देखील वेळ दिला याबद्दल त्यांचे कौतुक केले .
यावेळी मॅथ्स सर्कल समन्वयक व संस्था उपाध्यक्षा डॉ. सौ. सरोज कुलकर्णी यांनी मॅथ्स सर्कल उपक्रमामधील सर्व शिक्षक तसेच रोटरी क्लब मधील सर्व सदस्यांचा परिचय करून दिला. तसेच सर्वांचे स्वागत पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री .प्रसाद खोत म्हणाले की गणित हे आपल्या डीएनए मध्ये असून हे सुप्त गुण जागृत करण्याचे काम रेझिंग अ मॅथेमॅटिशन व राष्ट्रीय शिक्षण संस्था करीत आहे. गणितातील काम पुढे नेणारे ठरत असून याला आम्ही हातभार लावत आहोत. यातून विद्यार्थ्यांनी गणिताची आवड जोपासावी असे म्हटले.
यावेळी सौ. वृषाली नायर यांनी देशात वेगवेगळ्या संस्था मॅथ्सचे रेसिडेन्शियल कॅम्प आयोजित करत असतात अशा कॅम्पला आपल्या डोंबिवली मधून आपल्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवावा असे म्हटले.
यावेळी मॅथ्स सर्कलचे शिक्षक श्री.केदार पेणकर , श्री.सुंदरम शर्मा आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर विद्यार्थ्यांमधून कु.समृद्धी झगडे व श्री.स्पंदन मयेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यातआले.प्रमाणपत्र वितरणाच्या यादीचे वाचन श्रीमती पल्लवी गवळी यांनी केले .
संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैभवी संतोष सावंत यांनी गेले वर्षभर या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणोदय प्राथमिक शाळेतील शिक्षिका सौ मानसी पवार यांनी केले.
यावेळी रोटरी क्लबचे जिल्हा सचिव विनेश नायर, मुकेश सोनवणे आदींसह संस्थेचे कार्यवाह श्री. शिरीhष फडके, कोषाध्यक्ष श्री.संजय दीक्षित,संस्था कार्यकारणी सदस्य श्री .प्रकाश म्हात्रे, श्री.अरुण ऐतवडे यांसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक , समितीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक व विद्यार्थी उपस्थित होते .

0 टिप्पण्या