मुंबई- चेंबूर कॅम्प येथील पंचमुखी हनुमान मंदिरासमोर हिंदू स्वराज्य सेनेतर्फे अध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
या हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि हनुमान भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असे की यावेळी 'तारक मेहता का उलटा चष्मा ' या लोकप्रिय हिंदी मालिकेतील सर्व कलाकार आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे त्यांचे चाहते आणि हनुमान भक्तगणांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हिंदू स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेने अल्पावधीतच आपल्या सामाजिक उपक्रम राबविण्याच्या कल्पकतेने समाजामध्ये आपली चांगली प्रतिमा निर्माण केली आहे.

0 टिप्पण्या