जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये 2026 सालचे अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबीवर विचार विनिमयाचे आयोजन.







अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबींची तरतूद करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या अर्थसंकल्प मधे अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या तरतुदी सांगितल्या. 

त्याच अनुषंगाने  दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मधुबन वातानुकूलित दालनात जे एम एफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि  मुख्य वक्ते डॉ राजकुमार कोल्हे यांनी देखील सहज सुलभ भाषेमध्ये  विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पाची व्याख्या समजावून सांगितली.


रोजच्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक  आर्थिक व्यवहार होत राहतात. अगदी भाजीपाला घेण्यापासून ते सोने चांदी घेण्यापर्यंत व्यवहार सुरूच राहतात.हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आहे , अशी व्याख्यानाची सुरुवात करताना मुख्य वक्ते डॉ राजकुमार कोल्हे यांनी अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबींची तरतूद कशी करावी याबद्दल सांगितले.नवीन वर्षात नवीन पद्धतीने अर्थसंकल्प तयार केला जातो,  फार पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प वेगळे तयार केले जायचे, 2017 सालापासून प्रत्येक वस्तूवर अथवा जागेवर जी एस टी कर लागू करण्यात आला. पैशाचे नियोजन कसे करावे , याबद्दल माहिती देताना वक्ते डॉ राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की आज सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत सद्य परिस्थितीत कुणाही व्यक्तीला सोने चांदी खरेदी करताना सारासार विचार करावा लागेल परंतु ज्या व्यक्तींनी खूप पूर्वी सोने चांदी घेऊन ठेवली आहे त्यांना सद्य स्थितीत ते विकून  चौपट पैसे मिळू शकतात म्हणजेच काय तर पैशाचे नियोजन अशा पद्धतीने करणे हे देखील फायद्याचे आणि गरजेचे ठरू शकते असेही वक्ते डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या चर्चासत्रात  सांगितले.



    भारत हा संस्कृती प्रधान देश आहे.मंदिरे, मेळावे, सर्व नद्यांची आरती , उत्सव असे अनेक प्रकारची धार्मिक कार्ये भारतात होत असतात , अनेक परदेशी व्यक्तींना भारतीय संस्कृती बद्दल आकर्षण आणि आदर आहे म्हणून लाखो संख्येने पर्यटक भारतात येत असतात आणि त्यातूनच भारत सरकारला आर्थिक उत्पन्न प्राप्त होते , असे सांगताना पर्यटकांना गौतम बुद्धांबद्दल आदर वाटतो त्या कारणास्तव भारतात अनेक पर्यटक  बुद्धिष्ठ  मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात तसेच अयोध्या मधील राम मंदिर , असे अनेक तीर्थक्षेत्र आहेत की ज्या मधून एक नवीन अर्थसंकल्प ची तरतूद होऊन जाते असेही सांगितले. सोळा टक्के उत्पन्न हे पशुपालन व्यवसायातून प्राप्त होते.त्याच बरोबर औषधी पर्यटन, खेळ, प्रयोगशाळा, इत्यादी मधून आर्थिक उत्पन्न प्राप्त होते.


26 नोव्हेंबर रोजी संविधान बैठकीत देखील अर्थ संकल्प आणि आर्थिक बाबी ची तरतूद कशी करावी याबद्दल लिहून ठेवले गेले आहे असे वक्ते डॉ राजकुमार कोल्हे यांनी सांगितले तर घरातली प्रत्येक  गृहिणी  ही दैनंदिन अर्थसंकल्प आणि आर्थिक बाबींचे नियोजन करण्यात पुरुषांपेक्षाही सक्षम असते .

    एक रुपयाचे दहा रुपये कसे करता येईल याचा विचार करून आपणही नियोजनबद्ध दुप्पट उत्पन्न प्राप्त करू शकता असाही सल्ला सर्व विद्यार्थ्यांना दिला. भारतातील यशस्वी उद्योजक, व्यक्ती यांची उदाहरणे देऊन त्यांच्या जिद्दीने व विचारांनी आपणही मार्गदर्शन घेऊन यशस्वी रित्या आर्थिक उत्पन्न दुप्पट करू शकता असेही सांगितले.


  दोन तासाच्या सत्रामध्ये वक्ते डॉ राजकुमार कोल्हे सर यांनी अनेक संधी, मार्ग विद्यार्थांना उपलब्ध करुन दिले. सचिव डॉ प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच प्राचार्य, शिक्षक , विद्यार्थी मिळून 250 ते 300 श्रोते  चर्चासत्रात उपस्थितीत होते. अनेकांनी वक्ते डॉ राजकुमार कोल्हे सर यांना प्रश्न विचारून  आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन  समर्थन करून घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या