मंगळवेढा-पंढरपूर रस्ते अपघात: नगरसेवक संदेश पाटील घटनास्थळी; मृतदेह आज सायंकाळी डोंबिवलीत पोहोचणार

डोंबिवली:

एका नामांकित गारमेंट कंपनीमधील १३ कर्मचारी पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट तीर्थयात्रेसाठी गेले असताना, मंगळवेढा आणि पंढरपूरच्या दरम्यान त्यांच्या क्रुझरला भरधाव कंटेनर ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डोंबिवलीतील सविता गुप्ता आणि योगिनी केकाणे, तसेच परेल चे आदित्य गुप्ता वय १४ वर्ष ,कल्याणच्या सविता अहिरे या चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर ७ जण मंगळवेढा मधील संजीवनी हॉस्पिटल आणि २ जण सोलापूर  येथील सी एन एस या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून गंभीर जखमी आहेत.


या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक संदेश हरिश्चंद्र पाटील यांनी विलंब न लावता तात्काळ घटनास्थळाच्या दिशेने प्रयाण केले. त्यांनी रात्रभर सोलापूर येथे थांबून पीडित कुटुंबियांना आधार दिला.सकाळी ५ वाजल्यापासून संदेश पाटील आणि त्यांचे सहकारी मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटल, cns हॉस्पिटल सोलापूर,पोलीस स्टेशन आणि स्थानिक प्रशासनाशी बोलणे करून येथील  सर्व गोष्टी हाताळत आहे.
नगरसेवक संदेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या रुग्णालयातील पोस्टमार्टमची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून रुग्णवाहिका डोंबिवलीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत. आज मंगळवारी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास हे पार्थिव उमेश नगर येथे आणले जाण्याची शक्यता आहे.

स्थानिक प्रशासन आणि पदाधिकारी सातत्याने सोलापूर जिल्हा रुग्णालयाशी संपर्कात असून जखमींना योग्य उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण डोंबिवली शहरावर दु:खाचे सावट पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या