सोमय्या विद्याविहार विद्यापीठातर्फे ‘अफ़्साना 2026’ च्या माध्यमातून श्रवणशक्तीचा जागर

सोमय्या विद्याविहार विद्यापीठातर्फे ‘अफ़्साना 2026’ च्या माध्यमातून श्रवणशक्तीचा जागर
ठळक वैशिष्ट्ये:

●     सुमारे 30 हून अधिक कथाकार, कलाकार, शिक्षक आणि कारागिरांनी मौखिक, सादरीकरणात्मक तसेच समकालीन कथाकथन एकत्र.

●     प्रादेशिक लोककथा, पांडवानी, भर्तृहरी कथानक, उपहास आणि आदिवासी परंपरा अधोरेखित करून मध्य भारतावर, विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर लक्ष केंद्रित.

●     गुंतवून ठेवणाऱ्या पर्यावरण आधारित माटीमध्ये कठपुतळी, गोंड चित्रकला, लोकसंगीत आणि कथाकथनाचे मिश्रण.

●     द सोमय्या स्कूलमधील पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले, ज्यात कथांना केवळ प्रदर्शन म्हणून नव्हे तर सुरुवात म्हणून महत्त्व दिले गेले.

●     परस्परसंवादी कार्यशाळा, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आस्थापना तसेच सहभागात्मक अनुभवांनी स्वदेशी आणि प्रादेशिक आवाज अधोरेखित केले.

●     मुख्य अतिथी निखिल आडवाणी यांनी मौखिक परंपरेपासून ते चित्रपट आणि डिजिटल कथानकांपर्यंत सर्व माध्यमांमध्ये कथाकथनाबद्दल अंतर्दृष्टी सर्वांसमोर मांडली.



मुंबई, फेब्रुवारी 2026: अलीकडे लक्ष विचलित होण्याकरिता कारण लागत नाही आणि कथांचा वापर भरमसाठ वाढलेला आहे. अशास्थितीत  सोमय्या विद्याविहार विद्यापीठाने कथानकाचा वेग कमी करण्याचा निर्णय घेतला. अफ़्साना 2026- द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हलने श्रवणशक्तीला पुन्हा केंद्रस्थानी आणले आहे. कथाकथनाला केवळ सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून नव्हे तर शिकण्याचा, प्रतिबिंबित करण्याचा आणि सहानुभूती निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून स्थान दिले.

शिक्षण आणि सांस्कृतिक सहभागामध्ये कथाकथनाचे एकत्रीकरण करण्याच्या विद्यापीठाच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग म्हणून साकारण्यात आलेल्या अफ़्साना 2026 ने जवळपास 30 हून अधिक कथाकार, कलाकार, शिक्षक आणि कारागिरांना 10 + कार्यशाळा आणि सहभागात्मक अनुभवांसह एकत्र आणले. या महोत्सवात मौखिक परंपरा, लोककथा, चरण-श्लोक आधारित कथा, उपहास तसेच समकालीन कथाकथनाच्या पद्धती एकत्रित करण्यात आल्या. ज्यामुळे एका सामायिक मंचाची निर्मिती झाली. जिथे कथा या सादरीकरणापेक्षा जिवंत ज्ञान म्हणून अनुभवल्या गेल्या.


‘अफ़्साना’च्या या आवृत्तीने प्रादेशिक लोककथा, पांडवानी परंपरा, भर्तृहरी कथा, उपहास आणि आदिवासी कथाकथनाच्या प्रकारांना अग्रभागी ठेवून मध्य भारतावर, विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले. अनेकदा फारशा लोकप्रिय नसलेल्या आवाजांना केंद्रस्थानी ठेवण्याचा विश्वास या महोत्सवात सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या माध्यमातून प्रतिबिंबित झाला. शिक्षणाने सांस्कृतिक बहुसांस्कृतिकतेशी संलग्न असले पाहिजे आणि प्रभावी कथांच्या पलीकडे वास्तव जगले पाहिजे, ही बाब अधोरेखित झाली.

बिंदूः सेंटर्ड मेटाफर्स या संकल्पनेवर आधारित महोत्सवात कलाकार आणि सहभागींना केंद्र शोधण्याचा अर्थ काय या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. संकल्पना दृश्यदृष्ट्या लादण्याऐवजी, कथाकथनामुळे तो आवाज, हालचाल, ताल आणि कथात्मक संरचनेद्वारे व्यवस्थितपणे उदयास येऊ शकला. दृश्यांवर कमीत कमी अवलंबून राहून, कथाकारांची उपस्थिती हे प्राथमिक माध्यम बनले. ज्यामुळे प्रेक्षकांना सक्रियपणे श्रवणाचा आनंद घेता आला. तसेच भावनिकरित्या सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

या महोत्सवाची सुरुवात द सोमय्या शाळेतील पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्याने केली, ज्यात सोमय्या परिसंस्थेतील सामायिक तत्त्व अधोरेखित केले गेलेः कथाकथनाची सुरुवात जीवनात लवकर झाल्याने विद्यार्थ्यासह हा कलागुण विकसित होतो.  अशाप्रकारच्या प्रारंभाने कथांना मूळ बिंदू, कल्पनाशक्तीला आकार देणे, भावनिक जागरूकता आणि सुरुवातीच्या वर्षांपासून अनुभवात्मक शिक्षण म्हणून तयार केले.

महोत्सवात प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कुशल कथाकार निखिल आडवाणी यांची उपस्थिती लाभली. कथा सांगण्याचे माध्यम हे वय आणि अनुभवाच्या पलीकडे कसे जाते हे त्याच्या चित्रपटविषयक अंतर्दृष्टीने अधोरेखित केले. “मी लहान असताना कथा विणायचो, कधी चुका लपवण्यासाठी, तर कधी निव्वळ मनोरंजनासाठी. आज मी एका कथाकथनाच्या महोत्सवाचे उद्घाटन करतो आहे. माझ्या प्रवासाने मला शिकवले की प्रत्येक कथा, मग तिचा चित्रपट बनो अथवा न बनो, कथेचे बीज हे तिच्या मुळाशी स्पष्ट असणे आवश्यक आहे. चित्रपटासाठी, प्रत्येक दृश्याने, प्रत्येक क्षणाने त्या ‘वन लायनर’चे म्हणजे कथासाराचे समाधान केले पाहिजे. पडद्यावर असो किंवा जीवनात, कथा सांगण्याच्या पद्धतीला त्यामुळे शिस्त लागते”.


बालकल्पनेपासून ते अनुभवी व्यावसायिकांच्या कलाकृती, कथांना मर्यादा नसतात, यावर महोत्सवात भर देण्यात आला.

अध्यापनशास्त्र आणि सराव म्हणून कथाकथन

सादरीकरणाच्या पलीकडे, ‘अफ़्साना’ शिकण्याकरिता एक गुंतवून ठेवणारे वातावरण म्हणून काम करते. बिंदूचा अर्थ लावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आस्थापना, परस्परसंवादी कार्यशाळा आणि सहभागात्मक अनुभवांमुळे कथाकथन संवादात्मक आणि सर्वसमावेशक राहण्याचे सुनिश्चित झाले. देशी आणि प्रादेशिक आवाजांनी मध्यवर्ती जागा व्यापली, अनुभवात्मक, चिंतनशील आणि संदर्भात रुजलेल्या शिक्षणाप्रती विद्यापीठाच्या वचनबद्धतेला बळकटी दिली.

अफ़्साना सारख्या उपक्रमांद्वारे, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ सहानुभूती, गंभीर विचार, सांस्कृतिक साक्षरता आणि कल्पनाशक्ती विकसित करण्यात आपली भूमिका ओळखून आपल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक चौकटीत कथाकथनाचा समावेश करत आहे. परंपरात्मक स्थिर वारसा म्हणून जतन न करता गुंतलेली होती; कथा गतिशील, वैयक्तिक आणि वर्तमानाला प्रतिसाद देणाऱ्या राहिल्या.

अफ़्साना महोत्सवाच्या अध्यक्षा अमृता सोमय्या म्हणाल्या, “माझ्या सभोवती, घरी, प्रवासात, कौटुंबिक गोतावळ्यात कथा उलगडत असताना शांतपणे बसल्याच्या माझ्या सुरुवातीच्या काही आठवणी आहेत. कथा केवळ मनोरंजनच नव्हत्या; त्या सहानुभूती, लवचिकता, विनोद आणि जगण्याचे मार्ग शिकवत असत. कथा सांगणे म्हणजे एखाद्याच्या उपस्थितीबद्दल, एखाद्याच्या समोर बसण्याबद्दल आणि त्यांच्या कथांना तुम्हाला बदलण्याची परवानगी देण्याबद्दल आहे. अफ़्साना येथे, विद्यार्थी उत्सुकता, औदार्य आणि खुल्या मनाने ऐकतील, प्रत्येक कथा त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि समजूतदारपणाला आकार देईल, ही आशा आम्ही बाळगतो.”

सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीचे कुलपती समीर सोमय्या पुढे म्हणाले, “माझे आजोबा फक्त सहावी पर्यंत शिकले तरीही त्यांनी 'विद्याविहार' निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते, असे जग जे त्यांनी स्वत: कधीही अनुभवले नव्हते. आपण कल्पना करू शकतो का आणि आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या पलीकडे जग निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो का? आपल्या स्वप्नांचे विश्व? तेच माझ्यासाठी खरे आव्हान आहे”.

अगर फ़ुर्सत मिले पानी की तहरीरों को पढ़ लेना


हर इक  दरिया हज़ारों साल का अफ़्साना लिखता है

ते पुढे म्हणाले, “ज्याप्रमाणे प्रत्येक नदी हजारो वर्षांची कथा लिहिते, त्याचप्रमाणे या मंचावर येणारा प्रत्येक बालक स्वतःच्या कथा लिहितो. जिथे या कथा उलगडतील आणि पिढ्यांना प्रेरणा देतील, अशा जागा निर्माण करणे ही आमची भूमिका आहे.”


सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटीचे कुलगुरू अजय कपूर म्हणालेः “कथाकथन सोपे वाटते, परंतु ती एक कला आहे. ती बुद्धी, हृदय आणि शरीराला जोडते, विणण्याची परंपरा तंत्रज्ञानाशी जोडते आणि एक अशी छाप सोडते जी केवळ व्याख्याने उमटवू शकत नाहीत. माझे आजोबा एक अद्भुत कथाकार होते, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये त्यांच्या कथा ऐकण्यासाठी त्यांचा पाठलाग करताना मला उमगले की कल्पनाशक्ती आणि अंतःकरणाने तयार केलेली कथा मन, हृदय आणि आत्म्याला आकार देते. ही एका चांगल्या कथेची ताकद आहे, ती चिरंतन टिकते.” ते पुढे म्हणाले, 'एक शैक्षणिक संस्था म्हणून आपली भूमिका केवळ पुस्तकांमधून शिकवायची नसावी; तर संपूर्ण विद्यार्थी, शरीर, हृदय आणि बुद्धीचे पोषण करणे ही आहे. कथाकार, कलाकार आणि सर्जनशील मनांना उपलब्ध मंचावर आणून, आपण हे सुनिश्चित करतो की शिक्षण जिवंत, अनुभवी आणि परिवर्तनशील आहे. मन, शरीर आणि हृदय यांचे नियोजन, तयारी आणि संरेखन, अशा प्रकारे दृष्टी प्रत्यक्षात येते.”

दिवसाच्या अखेरीस, अफ़्साना 2026 ने स्वतःला केवळ एक कार्यक्रम म्हणून सिद्ध केले नाही, तर एक जिवंत परिसंस्था म्हणून सिद्ध केले, जिथे कलाकार, विद्यार्थी, शिक्षक आणि प्रेक्षकांनी सह-अर्थ निर्माण केला. अल्गोरिदमिक कथांच्या वेगवान डिजिटल जगात, या महोत्सवाने मानवी आवाजांची उपस्थिती, सहानुभूती आणि शक्तीची पुष्टी केली. परंपरा आणि अध्यापनशास्त्र यांचा मिलाफ झाला. ज्यामुळे एक कथा तयार झाली; जी पडदा पडल्यानंतरही बराच काळ टिकेल.

उल्का मयूर — टायगर देखा क्या?

आनंद खरोखर कुठे राहतो असा हळुवार प्रश्न विचारणारा, महत्त्वाकांक्षेचा एक खेळकर परंतु भेदक शोध.

 

संजय महाजन — राजा भर्तृहरी

मध्य भारतातील चरण-श्लोक आधारित कथापरंपरेत रुजलेल्या या सादरीकरणात लयबद्ध वर्णनाद्वारे शक्ती, त्याग आणि आंतरिक संघर्षाचे परीक्षण केले गेले.

 

मोनिका गुप्ता — इन्स्पेक्टर मातादीन चाँद पर

सत्ता, नोकरशाही आणि दैनंदिन नैतिक दुविधा प्रतिबिंबित करण्यासाठी विनोदाचा वापर करून, हरिशंकर परसाई यांच्या उपहासाचे बुंदेलखंड-संकल्पित रूपांतर.

 

 माटी — अक्षय गांधी, ईश्वर सिंग आणि सहदेव पुशम

जमीन आणि निसर्ग यांच्याशी मानवी संबंध शोधण्यासाठी एक गुंतवून ठेवणारे पर्यावरण-कथन कठपुतळी, गोंड चित्रकला, लोकसंगीत आणि मौखिक कथाकथनाचे मिश्रण आहे.

भारुड सादरीकरण - माया सोमय्या स्कूल ऑफ म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसमवेत सविता मोघे
बुद्धी आणि सामाजिक भाष्याने समृद्ध असलेला एक जिवंत शास्त्रीय प्रकार, जो परंपरा आपली धार न गमावता कशी विकसित होते यावर भाष्य करते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या