9 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये रंगणार सांस्कृतिक , कला, साहित्य व लघु फिल्म महोत्सव...


सा कला या विमुक्तये..म्हणजेच कला ही सर्व बंधनातून मुक्त करते. संपूर्ण जगावर भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक ठसा उमटविणारा आपला भारत देश म्हणजे कला आणि कलाकारांचे माहेरघरच होय.

  महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि मुंबई मधील एक सांस्कृतिक  उपनगर म्हणजे डोंबिवली , कला गुणांनी बहरलेले शहर. याच शहरामध्ये जान्हवी मल्टी फाऊंडेशन अंतर्गत शाळा महाविद्यालयांमध्ये दिनांक 19 ते 24 जानेवारी दरम्यान असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.यामध्ये दिनांक 19 जानेवारी रोजी रोजगाराची हमी मिळवून देणारा "  जे एम एफ रोजगार मेळावा ' ( Job Mela ) चे आयोजन करण्यात येणार आहे तरी लाभदायकांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.


काला घोडा महोत्सवाचे आकर्षण लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांनाच आहे आणि म्हणूनच
दिनांक २० जानेवारी रोजी प्रतिकृती ' काला घोडा महोत्सवाचे आयोजन ब्रह्मा रंगातलाय येथे रंगणार आहे.यामध्ये मोठे कलादालन सुसज्ज करण्यात येत आहे , या कलादालना मध्ये  चित्रकला भित्तीपत्रक, रांगोळ्या , तैलचित्र, वारसा हक्काने मिळालेले गड किल्ले, राजवाडे, व्यक्तिचित्र , नृत्य नाटिका, गायन वादन आणि इतर  सांस्कृतिक कला सादर होणार आहेत, त्यासाठी संपूर्ण डोंबिवली मधील शाळा, संस्थांना एक अमूल्य संधी प्राप्त होत आहे या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन ,  "काला घोडा महोत्सव प्रतिकृती "  मधे  सर्व विद्यार्थांनी सहभागी  होऊन आपल्या वारसा कलेचा मान वाढवून ती जोपासावी .डोळ्यांचे पारणे फेडणारा हा महोत्सव म्हणजे देशप्रदेशातील कलाकारांना नव्याने कलेचे दालन उघडून देण्याचा कलामय प्रवास आहे.दिनांक 12 जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करून घ्यावी.


  अनुक्रमे दिनांक २०, २१, आणि २२जानेवारी रोजी जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वंदे मातरम् पदवी महाविद्यालय यांचे स्नेह संमेलन आयोजित होणार आहे. शिक्षकेतर कर्मचारी करिता आन्तरशाळा व महाविद्यालय स्पर्धा" राष्ट्रज्योत पुरस्कार " वितरण सोहळा व 

जे एम एफ  ध्वनी  रेडियो स्टेशन चे उद्घाटन देखील पार पडणार आहे.त्याच बरोबर जे एम एफ मंडपम मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या खाद्य विक्री केंद्रासाठी  (stall) देखील इच्छुकांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावी. चित्रपट, नाटक, देखील पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. अंगभूत कला गुणांना वाव देण्यासाठी एकच कला दालन आपल्यासाठी उपलब्ध आहे ते म्हणजे जे एम एफ संस्था , ब्रह्मा रंगातलाय कला दालन. या महोत्सवा ची संकल्पना . 

संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे. संस्थापिका डॉ प्रेरणा कोल्हे यांनी साकारलेली आहे. या करिता सर्व जे एम एफ परिवार प्रयत्नाची पराकाष्ठा करून साजरा करण्यात मग्न झालेले  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या