गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांना" मानद डॉक्टरेट" पदवीने सन्मानित.


मुंबई  ( प्रतिनिधी) विक्रोळी मुंबई येथील वनिता फाउंडेशन व मिलिंद सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य  मुंबई जिल्हाध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांना आयएसओ प्राप्त यूनिवर्सल हार्मनी अवॉर्ड कौन्सिल नवी दिल्ली यांच्यावतीने गेली वीस ते पंचवीस वर्षे महाराष्ट्राच्या जडणघडणीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल " मानद डॉक्टरेट " डिलीट"  पदवीने सन्मानित करण्यात आले .




         गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांना राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय ,राज्यस्तरीय तीनशेहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले असून ज्येष्ठ पत्रकार ,समाजसेवक, आदर्श शिक्षक ,सहकार  व कामगार भूषण प्राप्त एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख सर्वत्र असून सहकार विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत प्रमाणित लेखापरीक्षक ऑडिटर ,निवडणूक निर्णय अधिकारी ,प्राधिकृत अधिकारी ,म्हणून काम करताना महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, शाहू महाराज ,यांच्या विचारप्रणालीतून व प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून उजाडलेले घरटं सावरण्याचा प्रयत्न करीत असलेले आई-वडील नावाची संस्था या सर्वांच्या विचाराने उभे राहिलेल्या अति कष्टातून शिक्षण घेऊन नोकरीसाठी व सामाजिक शैक्षणिक कार्य साठी गावापासून ते मुंबई पर्यंत भटकंती करीत असलेला  सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे दुःख समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वन वन भटकत सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कार्य करणारे सामाजिक ,शैक्षणिक, कला ,साहित्य ,सहकार ,कामगार ,आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात वयाच्या विसाव्या वर्षापासून झोकून देऊन महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्यक्ष कृतीच्या व वृत्तपत्र लेखनाच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे महान कार्य करत असल्याने महाराष्ट्र कामगार कल्याणचा मंडळाने सन 2013 चा " गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार " तसेच इतर सामाजिक संस्थेकडूनही तीनशेहून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले असून  सामाजिक ,सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता व सहकारातून समाजाचा विकास करत मनाची इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी ,माणसे जोडणारी कला आत्मसात करत माणसे आपलीशी करत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले 

          गुणवंत कामगार  प्रभाकर कांबळे समाजप्रबोधनाचा दीप लावणारे तसेच  " मानवसेवा बरोबर समाजसेवा हीच ईश्वर सेवा " या उद्देशाने पत्नीच्या नावाने " वनिता फाउंडेशन " ही सामाजिक संस्था स्थापन करून संस्थेमार्फत विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून जनतेची सेवा करणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सतत काम करत आहेत .

         घराघरात भारताचे संविधान पोहोचविण्यासाठी मुंबई शहर व पूर्व उपनगरात " संविधान गौरव " परीक्षेचे आयोजन करून घराघरात संविधान पोहोचवण्यात  त्यांचा सिंहाचा वाटा असून अनेक व्यक्तींनी त्यांचा लाभ घेतलेला आहे

   सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेला लागून असणाऱ्या चंदगड तालुक्यातील रामपूर या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्म झाला असून आई-वडील अशिक्षित असताना सुद्धा गरिबीचे चटके सहन करत दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करून पदवी,व पदव्युत्तर व बी .एड .त्याचबरोबर जी डी सी व डी सी एम पऱ्यांचे शिक्षण पूर्ण करून नोकरीनिमित्त पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत वास्तव केल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रायव्हेट कंपनीत नंतर विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून एक हजार रुपये पगारावरती शिक्षक म्हणून काही दिवस काम केले. त्याचबरोबर सहकारी संस्थेत काम करत जी डी सी चा अभ्यासक्रम पूर्ण केल्याने सहकार विभागात "प्रमाणित लेखापरीक्षक"ऑडिटर निवडणूक निर्णय अधिकारी, वृत्तपत्रलेखक ,मुक्त पत्रकार ,कवी साहित्यिक ,उपसंपादक, सहसंपादक, कार्यकारी संपादक, व्यवस्थापकीय संपादक तसेच एलआयसी व स्टार हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम पॉलिसी प्रतिनिधी, पॅन कार्ड गॅजेट एनजीओ संस्था रजिस्ट्रेशन व  ऑडिट ची कामे, व सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची कामे करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिल्ली च्या युनिव्हर्सल अवार्ड कौन्सिलने " मानद डॉक्टरेट " पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या