नवयुग मित्र मंडळातर्फे नवरात्रीत ठाण्यात २९ सप्टेंबरला मराठी विनोदी नाटक “प्री-वेडिंग”



          ठाणे: नवयुग मित्र मंडळभाजपा ठाणे शहरभाजप मानपाडा मंडलभाजप वसंत विहार-वर्तक नगर मंडळ,आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टआयोजित नवरात्र उत्सवाच्या २१ व्या वर्षानिमित्त,संस्थापक  रमेश आंब्रे उपाध्यक्ष भाजपाठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सकल मराठा समाज ठाणे  व कार्याध्यक्षा मा. नगरसेविका ठा.म.पा.स्नेहा रमेश आंब्रे यांच्या मार्गदर्शना खाली लग्न उशिरा झाले तरी चालेल पण जोडीदार योग्यच मिळाला हवा असे संदेश सांगणारे  "येवनेट"  नाट्य-निर्मित २ अंकी मराठी विनोदी  नाटक  प्री-वे़डिंग”  सोमवार दि :२९ सप्टेंबर २०२५ सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी ऑडिटोरियम नाट्यगृहहिरानंदानी मेडोज ठाणे,येथे आयोजित केले आहे.

         "प्री-वेडिंग"  नाटकाची निर्मीती वृषाली गणेश घुगरे,नाट्यलेखन मयूर योगीदिग्दर्शन डॉ. गणेश जनार्दन घुगरेनृत्ये राकेश शिर्केप्रसिद्धी संतोष धुरी यांची असून प्रीती जाटे आणि प्रशांत घुगरे या कलाकारांचा समावेश आहे. हे नाटक आताच्या काळात लग्न संस्था आणि लग्न जुळविताना विवाहइच्छुक तरुणांनी कोणत्या बाबींसाठी एकमेकांना लग्नाआधीच एकमेकांना सांभाळून घेण्याची वचने दिली पाहिजेत तसेच एकमेकांची परिस्थिती समजून घेतली पाहिजेजेणे करून लग्नानंतर त्यांचे आयुष्य आणि संसार सुरळीत चालेल. हे खरे प्री-वेडिंग आहे. या विषयावर प्रबोधनात्मक भाष्य करणारे  सध्या काळाची गरज असणारे हे नाटक आहे.

      नवरात्रीच्या मंगल वातावरणात हास्याची फुलझडती अनुभवण्यासाठी नाटक पाहायला जरूर या प्रथम १०० येणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आताच नि:शुल्क पासेस साठी संपर्क करा: उशीर करू नका. तुमची सीट बुक करा. सौ. स्नेहा रमेश आंब्रे भा.ज.पा. जनसंपर्क कार्यालयहाईड पार्क रेसिडेन्सीहिरानंदानी मेडोजठाणे 9768997272 येथे आजच संपर्क करा.

आपले,

संस्थापक - श्री. रमेशजी आंब्रे

कार्याध्यक्षा - सौ. स्नेहा रमेश आंब्रे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या