५८ व्या युवा महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या युवकांना रौप्य पदक भव्य यश संपादन.



       मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या ५८ व्या युवा महोत्सवामध्ये 12 झोन. 360 महाविद्यालय व त्यातून  सुमारे ४५ महाविद्यालयांची अंतिम सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सहभाग दर्शवला होता.

    डोंबिवली येथील वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाने मराठी नाटक सादर करून ४५ महाविद्यालयांमधून ' रौप्य पदक प्राप्त करून दुसरा क्रमांक निश्चित केला.



मराठी  गट नाटक ' अ ' मधून 

दिवेश मोहिते, साई कुडतुडकर , यश बाडेकर , सानिका तांबोळी, दुर्वा घाडी, तन्वी गुरव या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बाजी मारली तर संगीतकार आयुष सावंत व संस्कार कदम यांनी अवीट गोडीचे संगीत दिले .नाट्य दिग्दर्शक प्रथमेश देवकुळे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. सांस्कृतिक विभागाच्या संयोजक मिस मृणाली यांनी जातीने लक्ष घालून सांस्कृतिक विभागाची धुरा सांभाळली.

      सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे अभिनंदन व कौतुक करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल तुम्ही सर्वांनी वंदे मातरम् महाविद्यालयाचे नाव उज्वल केले तर मिळालेल्या यशाचे श्रेय हे कोणा एकाचे नसून सर्व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या समुदायाचे असते, तुमच्या मधील दिसणारे  प्रयत्न,एकी आणि जिद्द हेच खरे तर चकाकणारे ' रौप्य पदक आहे असे सांगून सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


       मराठी नाटकाची अस्मिता जागरूक ठेवून दर्जेदार नाटक लिहून सर्वच  विद्यार्थी कलाकारांनी आणि दिग्दर्शकाने झोकून देऊन रजत पदक भूषविले व आपल्या सांस्कृतिक शहर डोंबिवली आणि वंदे मातरम् पदवी महाविद्यालयचे नाव रोशन केले त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन.असे संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ नाडर,  उप प्राचार्या  डॉ वनिता लोखंडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वानी या सर्वांचे अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या