डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी आणि इन्फॉरमेशन सायन्स, सोमय्या विद्याविहार विद्यापीठात शिक्षक दिन उत्साहात संपन्न.



दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी आणि इन्फॉरमेशन सायन्स, सोमय्या विद्याविहार विद्यापीठात लायब्ररी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन  समारंभ आयोजन केले होते.  डिपार्टमेंट हेड- युनिव्हर्सिटी लायब्ररियन (ग्रंथापाल) डॉ. निरूपमा वारियर, प्राध्यापक डॉ. त्रिप्ती गोगोई, असिस्टंट लायब्ररीयन किरण शर्मा, के. जे. सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेण्ट ऑफ रिसर्च लायब्ररियन राजेश मेमाने, धर्मा स्टडिज संस्थेचे लायब्ररीयन सागर खटाळे हे सर्व शिक्षकवृंद तसेच डेप्युटी रजिस्ट्रार डॉ. राम कृष्णन सुंदरम, सिनियर प्रोफेशनल असिस्टंट गीतांजली वाणी, सिनियर प्रोफेशनल असिस्टंट भावना मोहिले, लायब्ररी असिस्टंट विजय गेहलोट, उमेश वीरकर ह्या सर्व डिपार्टमेंट मेंबर्सना आमंत्रित करून कार्यक्रम प्रारंभी सर्वांचे स्वागत एम एल आय एस प्रथमवर्ष विद्यार्थिनी श्रेया क्षीरसागरतर्फे सर्वांचे स्वागत करण्यात आले. शिक्षकांवर आद्ररयुक्त असा सुविचार वाचन प्रथम वर्षं विद्यार्थिनी सेजल यादवने केले. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणारी स्वरचित हिंदी कविता प्रथम वर्षं विद्यार्थिनी अभिज्ञा सांगळे हिने उत्स्फूर्त सादर केली. तसेच प्रथम वर्षं विद्यार्थ्यांच्या वतीने तयार केलेली शिक्षक आणि डिपार्टमेंट स्टाफ वरील चित्रफित प्रसारित करण्यात आली. सर्वांनी त्या सुखद आठवणीचा मनमुराद आनंद घेतला. द्वितीय वर्षं विद्यार्थी सचन ईपे याने इंग्रजी भाषेत सर्व शिक्षकांच्या आणि डिपार्टमेंट स्टाफच्या नावाचा उल्लेख असलेली स्वरचित काव्यरचना सादर केली. विद्यार्थ्यांतर्फे शिक्षकांना स्वहस्ते बनविलेले कल्पक भेटकार्ड आणि विद्यार्थिनीप्रथम वर्षं विद्यार्थिनी अभिज्ञा तर्फे पेन सेट भेट देण्यात आले. 

डॉ. निरूपमा वारियर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अभ्यासासोबत अशा छोट्या मोठया आयोजनातूनच विध्यार्थी घडत असतात. आजच्या आधुनिक युगातही विध्यार्थ्यांना शिक्षकांसाठी असणारा आदर शिक्षकदिनाच्या निमित्ताने नव्याने व्यक्त करण्याची संधी मिळते आणि त्यातूनच व्यक्तीमत्व विकास होतो. सोमय्या विद्यापिठातील लायब्ररी सायन्स डिपार्टमेंटच्या विध्यार्थ्यानी अभ्यासाबरोबरच विद्यापीठातील  सर्व उपक्रमात सक्रिय सहभागी होऊन कला गुणांना वाव द्यावा.  शिक्षकवृंदतर्फे असिस्टंट लायब्ररीन, प्राध्यापक किरण शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक डॉ. त्रिप्ती गोगोई, राजेश मेमाणे, सागर खटाळे यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त आयोजनाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. डेप्युटी रजिस्ट्रार डॉ. रामकृणन यांनी अभ्यासासोबत विद्यापीठ हरित राहण्यासाठी, राखण्यासाठी मुलांनी सदैय पुढाकार घेऊन आनंद घ्यावा असे सांगितले. सिनियर प्रोफेशनल असिस्टंट भावना मोहिले यांनी छोटे आकर्षक गेम आयोजन विध्यार्थ्यांकडून करून घेतले, सिनियर प्रोफेशनल असिस्टंट गीतांजली वाणी यांनी मधुर गायनाने वातावरण सुरमयी केले. समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा विध्यार्थ्यानी गेमचा आनंद लुटला. विजेत्यांना फुल ना फुलाची पाकळी असे बक्षीस भावना मोहिले यांचेकडून देण्यात आले. विध्यार्थिनी श्रेया क्षीरसागरने आभार प्रदर्शन केले. अल्पोहाराचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम आयोजनासाठी एम एल आय एससी प्रथमवर्षं विध्यार्थिनी  श्रेया, सेजल, अभिज्ञा, जागृती भानुशाली, निकिता भानुशाली आणि द्वितीयवर्ष विध्यार्थी आदित्य साळुंके व सचन ईपे यांनी सिनियर प्रोफेशनल असिस्टंट भावना मोहिले व गीतांजली वाणी यांच्या सहाय्याने तयारी केली होती.

शब्दांकन 

गीतांजली वाणी 

सिनियर प्रोफेशनल असिस्टंट 

युनिव्हर्सिटी लायब्ररी

सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या