टाळ मृदुंगाच्या आणि विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांचा भक्तिमय दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
कल्याण:- बालक मंदिर संस्था कल्याण प्राथमिक शाळा मराठी विभाग व बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त टाळ,मृदुंगाच्या आणि विठ्ठल नामाच्या गजरात बालगोपाळांची दिंडी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बाळगोपाळांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत विठ्ठल,रुख्मिणी,संत ज्ञानेश्वर महाराज,संत मुक्ताबाई,संत तुकाराम महाराज अश्या अनेक वेशभूषा करून बघ्यांची मने जिंकत दिंडीला एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत शोभा वाढवली.बालगोपाळांच्या विठुमऊलीच्या जयघोषाने संपूर्ण कल्याण नगरी दुमदुमून उठली यावेळी बालकमंदिर संस्था प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक वर्ग व शिक्षक इतर कर्मचारी आणि बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे पदाधिकारी व सदस्य यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने दिंडी चे सुरक्षितरित्या नियोजन केल्याने सर्व स्थरातून आयोजकांचे कौतुक करण्यात आले.या दिंडी सोहळ्याला बालकमंदिर संस्था कल्याण चे कार्यवाह सुश्रुत वैद्य , बालकमंदिर प्राथमिक शाळा शालेय समिती अध्यक्ष रमेश गोरे तसेच बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे यांच्या हस्ते विठुमऊलीच्या पालखीचे पूजन करून दिंडीची सुरवात करण्यात आली व बाळगोपाळांना महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेचे व वारकरी संप्रदायाचे आणि दिंडीचे महत्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले.ऐतिहासिक कल्याण नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुरातन विठ्ठल रुख्मिणी मंदिरात महाआरती करून दिंडीची सांगता करण्यात आली.
यावेळी बालकमंदिर संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी वैदेही बागुल मॅडम , पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा प्रेरणा माळी कोषाध्यक्ष सरिता शेदड अतिरिक्त मुख्याधापिका प्रतिभा मोरे आणि विद्या घुले तसेच बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या अध्यक्षा सुजाता कांबळे-डांगे, सहकार्यवाह मेघा शृंगारपुरे, विशाल पितळे, कार्यकारिणी सदस्य सौरभ आरोटे, भूषण मेहेर,सई मेहेर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पानसरे यांनी केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत मंगेश घाटे यांनी केले.
0 टिप्पण्या