नवी मुंबई : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मुंबईच्या हॉस्पिटलच्या प्रांगणात मंगळवार दिनांक १ जुलै २०२५ रोजी, आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमच्या विद्यमाने डॉक्टर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टरांच्या सेवेचा सन्मान आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. एस. सी. मुडगेरिकर उपस्थित होते. प्रसंगी डॉ. सौ. स्मिता मुडगेरिकर, उपमहाव्यवस्थापक सौ. रेखा देवाडिगा, जितू खानचंदानी, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यु. एस. झा, डॉ. गोपाळ पाटील, फोरमचे अध्यक्ष व्ही. डी. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आरसीएफ व्यवस्थापनाच्या वैद्यकीय सेवेची कार्यक्षमता व सेवानिवृत्त बांधवांप्रती असलेली बांधिलकी आणि त्यादृष्टीने व्यवस्थापन टाकत असलेलं सकारात्मक पाऊल, हे सांगतानाच एस. सी. मुडगेरिकर म्हणाले की, आजचा दिवस हा डॉक्टरांच्या योगदानाची आठवण करुन देणारा आहे. असे सांगून त्यांनी फोरमच्या कार्याचे कौतुक केले. अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे फोरमने कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी बांधव यांचा दुवा साधला आहे व सर्वांना जोडून ठेवले आहे. प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना श्री. यु. एस. झा म्हणाले की, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बिधान चंद्र राय यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. डॉक्टर आपल्या आजारात फक्त उपचारच नाही तर मानसिक धैर्यही देतात. आरसीएफ हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा तसेच व्यवस्थापनाचा सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांना चांगला सहयोग मिळतो असे सांगून त्यांनी डॉक्टर हा पेशा समर्पणाचे प्रतीक असल्याचे नमूद केले. सुरुवातीस व्ही. डी. पाटील यांनी प्रास्ताविक करुन आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सखोलपणे उपस्थितांना विषद केला.
या कार्यक्रमात डॉ. सौ. स्मिता मुडगेरिकर यांच्यासह आरसीएफ हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. रेखा देवाडिगा, डॉ. पी. जे.शिंपी, डॉ. एम. एस. पेटकर, डॉ. एस. एस . शेंडे, एच. व्ही. लोखंडे, डॉ. आर. कुमार, डॉ. स्नेहल लवाटे, डॉ. निलय सराफ, डॉ निलेश्वरी मानगवे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुच्छ व गिफ्ट देऊन सन्मान करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फोरमचे सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले तर शेवटी डॉ. रेखा देवाडीगा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आरसीएफ व्यवस्थापनाने संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यास सक्रिय सहयोग दिला.
--------------------------
प्रेषक :
सुभाष हांडे देशमुख
नेरुळ
0 टिप्पण्या