चेंबूर मेट्रोचे 'डायमंड गार्डन' नाव बदलण्यासाठी आंदोलनाचा इशारा


चेंबूर मेट्रोचे 'डायमंड गार्डन' नाव बदलण्यासाठी आंदोलनाचा इशारा

*सर्वपक्षीय नेत्यांची  निदर्शने*

मुंबई- चेंबूर येथील नारायण गजानन आचार्य उद्यानाजवळ नव्याने  सुरू होणार्‍या मेट्रो स्थानकास प्रशासनाने  'डायमंड गार्डन' असे नाव  देण्याचा निर्णय घेतला आहे.तरी त्यास चेंबूरकर नागरिकांनी जोरदार विरोध करत या स्थानकास स्वातंत्र्य सेनानी नारायण गजानन आचार्य स्थानक असे  नाव देण्याची मागणी केली आहे.या मागणीसाठी चेंबूरकर जनता आणि सर्वपक्षीय नागरिकांनी नुकतीच तीव्र निदर्शने केली. यावेळी मागणी  पूर्ण न केल्यास जनआंदोलन  छेडण्याचा इशाराही देण्यात आला. 

चेंबूरमधील स्थानिक जनतेला विश्वासात न घेता मेट्रो प्रशासनाने 'डायमंड गार्डन' स्थानक नाव देण्याचा घेतलेला निर्णय चेंबूरकरांच्या अस्मितेला धक्का पोहोचविणारा असल्याचे मत यावेळी अनेकांनी मांडले.या निदर्शन आंदोलनामध्ये कॉंग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रवींद्र पवार,मनसे नेते राजाभाऊ चौगुले,
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुबोध आचार्य, मनसे उपाध्यक्ष नवीन आचार्य,माजी नगरसेवक अनिल पाटणकर,दीपक शिसोदे,माजी नगरसेविका नगरसेविक आशाताई मराठे, आरपीआयचे रवींद्र गायकवाड,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक सावंत,शिवसेना शाखाप्रमुख अविनाश शेवाळे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे, चंद्रकांत डोळसे, बापूसाहेब थोरात, सुधाकर यादव आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे  हे या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या