ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ तर्फे पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली



 ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ तर्फे पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली


नवी मुंबई :  सुभाष हांडे देशमुख 


नवी मुंबई : पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आणि पर्यटकांच्या हत्येचा निषेध सर्व स्तरातून होतो आहे.  काश्मीर खोऱ्यातही व्यापक स्वरूपात उत्स्फूर्तपणे निदर्शने करण्यात येत आहेत. नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी  श्रीयुत अण्णासाहेब टेकाळे अध्यक्ष, फेसकॉम  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत  जेष्ठ  नागरिक संघ , नेरुळ , अखिल  भारतीय जेष्ठ नागरिक महासंघ , महाराष्ट्र जेष्ठ  नागरिक महासंघ   या संघटनांतर्फे काश्मीर मधील

पहलगाम येथे करण्यात आलेल्या दशहतवाद्यांच्या  निघृण   हल्ल्यात  प्राण  गमावलेल्या निरपराध पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि  पुढील ठराव एक मताने सम्मत करण्यात आला .

“ ही सभा  काश्मीर येथील पहलगाम येथे  निरपराधी पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड दशहतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहे .”

-----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या