नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख)
नवी मुंबई : नेरुळ उपनगरातील सेक्टर ९ मधील एन एल टू टाईप च्या वसाहतीत श्रीराम नवमी सार्वजनिक उत्सव समितीच्या विद्यमाने श्रीराम जन्मोत्सव दिनांक सहा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहाने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. भजन, राम जन्मोत्सव सोहळा, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सत्यनारायणाची महापूजा, लहान मुलांच्या व मुलींच्या विविध स्पर्धा आदि उपक्रम आयोजित करुन श्रीराम जन्मोत्सव आनंदी वातावरणात साजरा झाला. वसाहतीतील नागरिकांनी व मुलांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात भाग घेऊन उत्सव अधिक भारदस्त केला.
त्याचप्रमाणे माजी नगरसेविका श्रीमती मीरा पाटील, श्रीमती शिल्पा कांबळी, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, सुरेश शेट्टी तसेच रामचंद्र पाटील, शशी जोशी, जयेश भावसार, महादेव जाधव, सुभाष हांडे देशमुख आदि अनेक मान्यवरांनी सहयोग देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
0 टिप्पण्या