ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कवी व नाटककार वि.वा.शिरवाकडर(कुसुमाग्रज ) जयंती, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो तो कार्यक्रम,त्रिमूर्ती सदन, डोंबिवली प. येथे संपन्न झाला
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री तात्याबा शेपाळ सर, उपाध्यक्ष श्री.मगन सुर्यवंशी सर,सौ.गीता नवरे ताई,सौ.वैशाली कोरडे ताई,श्री.केशव भोईर सर,अशोक हेगिष्टे तसेच श्री तुषार भोईर आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री केशव भोईर सर, संस्थेचे अध्यक्ष श्री शेपाळ सर तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व श्री सरस्वती तथा कुसुमाग्रजांच्या प्रतिमाना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली.मा.श्री सुर्यवंशी सर तसेच मा.सौ.वैशाली कोरडे ताई यानी कविता सादर केल्या.मा.श्री.शेपाळ सर आणि सचिव मा.श्री अशोक हेगिष्टे यांनी मराठी भाषा अभिजात कशी झाली याची विस्तृत माहिती दिली. मा .श्री केशव भोईर सर यांनी अध्यक्षीय भाषणासोबत उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.🙏🙏
0 टिप्पण्या