मुंबई :
ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाचा २८ वा वर्धापन दिन विकास हायस्कूल कन्नमवार विक्रोळी येथे ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत आनंदात साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना फेस्कॉमचे अध्यक्ष सुरेश पोटे म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांनी दररोज चालले पाहिजे. व्यायाम करून प्रकृती ठणठणीत ठेवली पाहिजे. मित्र मंडळीशी संवाद साधला पाहिजे. मित्र मंडळी म्हणजे हसत हसत वाजवू टाळ्या नको औषध नको गोळया
ते पुढे म्हणाले की मी विक्रोळीचा आहे. माझ्या सामाजिक कार्याची व पत्रलेखनाची सुरुवात गेल्या ४० वर्षांपूर्वी विक्रोळी मधून झाली व गेली २५ वर्षे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करत आहे. याप्रसंगी त्यांनी फेस्कॉम तर्फे केलेल्या कामाचा आढावा व ज्येष्ठांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सोयी सवलतीची माहिती दिली व फेस्कॉम मार्फत विविध स्पर्धा चे आयोजन केले त्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश सरनोबत होते. या प्रसंगी विक्रोळीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनीलभाऊ राऊत, माजी आमदार मंगेश सांगळे, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत, मंडळाचे फॅमिली डॉ. हरिष पांचाळ, सल्लागार औंदुबर सराफ, वासुदेव कदम,मुकुंद कुलकर्णी, मंडळाचे माजी अध्यक्ष वृत्तपत्रलेखक कृष्णा काजरोळकर, माजी अध्यक्ष विनायक पेवेकर, पत्रकार समाजभूषण नासिकेत पानसरे आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मंडळाच्या गायकांनी गुरुवर्य गायक विनायक पेवेकर व गायक विवेक गायकवाड यांच्या नेतृत्वात हिंदी व मराठी गाण्याचा बहारदार कार्यक्रम सादर करुन वातावरण प्रफुल्लित केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळाचे सचिव संजय मयेकर यांनी खुमासदारपणे केले होते.
0 टिप्पण्या