'पवई महोत्सव' अंतर्गत जिल्हास्तरीय भव्य कबड्डी महोत्सव थाटात संपन्न
मुंबई- मुंबईतील पवई विभागात चंदन शर्मा मित्र मंडळ आयोजित माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्या पुढाकाराने 'पवई महोत्सव' अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन शर्मा फाऊंडेशनचे अध्यक्ष नरोत्तम शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. 'पवई महोत्सव' अंतर्गत चंदन शर्मा मित्र मंडळाने आयोजित केलेल्या किडा महोत्सवाला 'शर्मा फाऊंडेशनने' पुरस्कृत केले होते.
कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात प्रथम श्रेणी पुरूष गटात मुलुंड किडा केंद्राने १९-१३ या गुणांच्या फरकाने घाटकोपर येथील नवरत्न स्पोर्टस् अकॅडेमीचा परावभ केला अंतिम फेरीच्या सामन्यात द्वितीय श्रेणी पुरूष गटात मुलुंड येथील शूर जवान किडा मंडळ यांनी २६-२५ या गुणांनी भांडूप येथील शिव शंभो क्रिडा मंडळाचा पराभव केला. तर महिला गटाच्या अंतिम फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात वांद्रे येथील महात्मा गांधी स्पोर्टस् अकॅडेमी यांनी ३५-२५ या गुणांच्या फरकाने घाटकोपर येथील महात्मा फुले स्पोर्टस् क्लबचा पराभव केला. 'अ' गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलुंड क्रिडा केंद्राच्या रोहित राठोड यांची निवड करण्यात आली. तर सर्वोत्कृष्ट चढाई म्हणून घाटकोपर येथील नवरत्न स्पोर्टस् अकॅडेमीच्या यश डोंगरे आणि सर्वोत्कृष्ट पकड म्हणून मुलुंड क्रिडा केंद्राच्या योगेश गुरव याची निवड करण्यात आली. 'ब' गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलुंड येथील शूर जवान क्रिडा मंडळाच्या निखिल चव्हाण यांची निवड करण्यात आली तर सर्वोत्कृष्ट चढाई म्हणून भांडूप येथील शिव शंभो क्रिडा मंडळाच्या सिद्धेश गायकवाड आणि सर्वोत्कृष्ट पकड म्हणून शूर जवान क्रिडा मंडळाच्या साहिल पतयाने याची निवड करण्यात आली.
'महिला' गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वांद्रे येथील महात्मा गांधी स्पोर्टस् अकॅडेमीच्या करीना कामतेकर हिची निवड करण्यात आली. तर सर्वोत्कृष्ट चढाई म्हणून महात्मा गांधी स्पोर्टस् अकॅडेमीच्याच स्नेहल चिंदरकर हिची आणि सर्वोत्कृष्ट पकड म्हणून घाटकोपर येथील महात्मा फुले स्पोर्टस् क्लबच्या सृष्टी मिश्रा हिची निवड करण्यात आली. विजेता, उपविजेता संघ आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूंना चंदन शर्मा व मान्यवरांच्या हस्ते 'पवईचे शिल्पकार माजी नगरसेवक स्वर्गीय चित्तरंजन शर्मा स्मृती चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.कबड्डी महोत्सव यशस्वी करण्यासाठी मुरलीधर खंडागळे,अनिल विरारे, जयवंत काटे, सुभाष गवई, कैलास कुशेर, सुंदरम् रोकडे, वाळू कहडणे, संतोष गुप्ता, इक्बाल शेख, मासुमअली शेख, धोंडूराम शिंदे, पल्लवी नाडर, जॉन नरोन्हा, चंद्रकांत निलाग्खे या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिक लाखण यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. तसेच मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोशिएशनचे सामना निरीक्षक हेमंत तोडणकर, प्रभाकर लकेश्री आणि सर्व पंचांचे मोलाचे सहकार्य लाभले या महोत्सवाला सामाजीक, राजकीय व विविध स्तरातील मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या.


0 टिप्पण्या