जाह्णवीज मल्टी फाउंडेशन संस्थेचे वंदे मातरम डिग्री महाविद्यालय डोंबिवली पश्चिम येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे सर यांनी ऑपेरेशन बजेट 2025-26 या विषयावर कार्यशाळेचे आज दि. 03/02/2025 सोमवार रोजी सकाळी 11:00वा मधुबन हॉल येथे आयोजन केले होते. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सन्मा.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या 2025-26 च्या बजेटवर चर्चा आणि माहिती देण्यासाठी एक सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

यात इंग्रजांच्या काळापासून चालत आलेले वेळ का बदलण्यात आली याची माहिती देण्यात आली आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून एक फेब्रुवारी रोजी देशाचा बजेट सादर करण्यात येतो.ज्ञान (GYAN) म्हणजेच Garib, Youth, Annadata & Nari अशा गोष्टींचा उहापोह केला. बजेट मध्ये उल्लेख केलेल्या सर्व गोष्टीचा समावेश करण्यात आला.देशाची अर्थ व्यवस्था कशी मजबूत करता येईल आणि जीडीपी कसा वाढेल याकडे लक्ष देण्यात आल्याचेही सांगितले.
इतर विकसित देशामध्ये असलेली अर्थ व्यवस्था कशी मजबूत आहे याचाही विचार मांडला. अनेक विषयावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचे डॉ.राजकुमार कोल्हे सर यांनी समाधान केले. सदर सेमिनारसाठी शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण 300 जणांचा सहभाग होता. सदरच्या सेमिनार मुळे विद्यार्थ्यां आणि शिक्षक वर्ग यांच्या ज्ञानामध्ये भर पडली. या कार्यक्रमात संस्थेच्या सचिव डॉ.सौ.प्रेरणा राजकुमार कोल्हे मॅडम ह्याही उपस्थित होत्या.


.jpeg)
0 टिप्पण्या