संभाजी ब्रिगेड ठाणे च्या वतीने संभाजी ब्रिगेड ठाणे महानगर अध्यक्ष शिवश्री सुजयजी सावंत यांनी (मा.उपजिल्हाधिकारी ठाणे) यांच्या समोर सदर निवेदन देताना व्यक्त केले.






 गुरुवार दिनांक २७-०२-२०२५ रोजी संभाजी ब्रिगेड ठाणे महानगर च्या वतीने श्री.संदीप माने साहेब (मा.उपजिल्हाधिकारी ठाणे) यांना प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्ती वर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, समाजिक तेढ निर्माण करणे तसेच जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.सदर प्रसंगी संभाजी ब्रिगेड ठाणे च्या वतीने संभाजी ब्रिगेड ठाणे महानगर अध्यक्ष शिवश्री सुजयजी सावंत, सचिव शिवश्री संजीव येद्रे, कार्याध्यक्ष शिवश्री कृष्णा सावळे, सदस्य शिवश्री राजेश भोसले उपस्थित होते.


प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करून बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत  लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील आहे.


प्रशांत कोरटकर या व्यक्तीने संबंधित ऑडिओ कॉलमध्ये पुढील वक्तव्ये केली आहेत :-

१) ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही काम करत आहे हे लक्षात ठेवा. २) बाजीप्रभू नसते तर तुमचा महाराज जीवंत नसता. ३) तुमचे महाराज पळून गेले. ४) जेम्स लेनचे पुस्तक वाचा, लोकांना सांगा जेम्स लेनने काय म्हटले आहे, व्हू इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, हे लोकांना सांगा. ५) ब्राह्मणांना कमी समजू नका, तुम्हाला ब्राह्मणांची ताकत दाखवतो, मग तुम्ही कितीही मराठे एकत्र करा. ६) छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर हा ब्राह्मण होता, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीत पडलं नसतं. ७) * रेकॉर्ड कर तुझ्या बापाला, ब्राह्मणांना बोलशील ना तर तुझी * मारून टाकेन * ८) ज्यादिवशी ब्राह्मणाचा शब्द काढशील त्यादिवशी परशुरामाचा परशू तुझ्या * घुसवील * ९) तुला तिथं येऊन मारीन. १०) तुला घरात येऊन मारीन *.. 


सदर ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग https://www.facebook.com/share/v/15sdFaan1G/ या लिंकवर (Indrajit Sawant यांच्या फेसबुक वॉलवर) उपलब्ध आहे.


प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी करणे, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ निर्माण करणे व जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी या करिता महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड च्या वतीने 

मा.जिल्हाधिकारी तसेच मा.पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहेत. तसेच या विकृत माणसाची त्याला शोभेल अशी धिंड काढणाऱ्या व्यक्तीसाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने एक लाख रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

महापुरुषांवर व्यक्तीवर अशा प्रकारची गरळ ओकण्याचे सत्र सध्या महाराष्ट्रात अनुभवायला मिळत आहे आणि अशा प्रकारची मानसिकता हेतू पुरस्सर समाजात पसरवण्याचा हा कुटील डाव असल्याचा दाट संशय पुरोगामी महाराष्ट्रातील अनेक विचारवंत व्यक्त करत आहेत. सदर गोष्टीचा थोडा अभ्यास केला तर या मागे विशिष्ट विचारसरणीचा गट कार्यरत असल्याचे स्पष्ट होते.

*अशा प्रकारची नीच आणि विकृत गरळ ओकणाऱ्या व्यक्तीवर कायमचा पायबंद व्हावा याकरिता एक भक्कम कायदा अमलात आणला गेला पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेड ठाणे महानगर अध्यक्ष सुजयजी सावंत यांनी श्री. संदीप माने साहेब (मा.उपजिल्हाधिकारी ठाणे) यांच्या समोर सदर निवेदन देताना व्यक्त केले. त्यावर शासन दरबारीं आपले मत अवश्य पोहोच केले जाईल अशी हमी मा.उपजिल्हाधिकारी यांनी दिली.*



 राज्य सरकार, गृह विभाग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करून घेण्यात किंवा कारवाई करण्याबाबत गांभीर्य दाखवले नाही, तर संभाजी ब्रिगेड व सर्व शिवप्रेमींच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या जातील असे संभाजी ब्रिगेड च्या वतीने जाहीर केले गेले आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या