चेंबूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे फातर्पेकर 'हॅटट्रिक' च्या तयारीत



 चेंबूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे फातर्पेकर 'हॅटट्रिक' च्या तयारीत


मुंबई- वरळी आणि माहीमनंतर मुंबईकरांचे लक्ष वेधून असलेल्या चेंबूर  विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.याठिकाणी विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर हे  हॅट्ट्रीक मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून फातर्पेकर यांनी आपली निवडणूक प्रचार मोहीम सुरू केली आहे. 


प्रकाश फातर्पेकर यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे तुकाराम काते,रिपाइं (आंबेडकर)पक्षाचे दिपक निकाळजे,मनसेचे माऊली थोरवे आणि वंचितचे आनंद जाधव असे चार उमेदवार निवडणूक रिंगणात  उतरले आहेत.तरीही या मतदारसंघात खरी लढत प्रकाश फातर्पेकर आणि  तुकाराम काते या दोन्ही शिवसेना उमेदवारांमध्येच दिसून येत आहे.फातर्पेकर  हे या मतदारसंघातून याआधी दोनदा निवडून आले आहेत.महाविकास आघाडीतील मित्रपक्ष  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा पवार गट फातर्पेकर यांच्या प्रचारात खांद्याला खांदा लावून दिसत आहे.या एकजुटीचा फायदा फातर्पेकर यांना मिळण्याची  दाट शक्यता वर्तवली जात आहे.मागील दोन्ही निवडणुकीत फातर्पेकर यांचे प्रमुख विरोधी उमेदवार काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे हे होते. मात्र यंदा हंडोरे यांचीच साथ फातर्पेकर यांना लाभली आहे.त्यामुळे त्यांचे संभाव्य मतांचे पारडे जड  झाले असल्याचे बोलले जात आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या