लाडका लोकनेता.... रस्त्यावरून चालणारा .....

लाडका लोकनेता.... रस्त्यावरून चालणारा ..... 

नमस्कार मंडळी! 

नुकतीच सार्वत्रिक विधानसभा निवडणूक झाली. आताच 23 तारखेला निकाल ही पूर्णपणे हाती आले. 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणेच लोकनेता, सर्वांचे दादा रविंद्र चव्हाण हे भरघोस मतांनी निवडून आले.... एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातच महायुतीला भरघोस यश मिळालं....एका सक्षम विचारधारेचा विजय झाला. महाविकास आघाडीचा चक्क चक्क काय म्हणतात तो सुपडा साफ झाला.... डोंबिवली 143 विधानसभा मतदारसंघ या मर्यादेसंदर्भात बोलायचं झालं, तर दादांनी विरोधकाला पूर्णतः नेस्तनाभूत केलं.... विजय चौकार लगावला.... आपणच खऱ्या अर्थाने लोकनेता आहोत याची जणू काही कायमस्वरूपी ओळखच करून दिली.... शांत संयमी नेतृत्व.... कर्तव्य निष्ठेला जागणारे कर्तृत्व.... आणि गरजूंसाठी अंगी बाणलेलं दातृत्व याची एकत्रित ओळख म्हणजेच आमचे रवी दादा..... कोणी माणूस एका रात्रीत मोठा होत नसतो..... त्यामागे प्रयत्नांची पराकाष्टा असते... सोन्या चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना कसं काय समजणार.....कसं काय उमजणार हे सारं.... असो.... 

निवडणुकीच्या निकालाचा दिवस आला... आम्ही सर्वजण बाहेर प्रतीक्षा करत होतो... आमच्या सारख्याच भावना प्रत्येकाच्या मनांत होत्याच आणि त्या त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत्या.... आणि जेव्हा समोरून दादा आले..... दादांना भेटण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात एवढी तीव्र होती जनसमुदायाला आवरताना कार्यकर्त्यांना आणि सुरक्षा रक्षकांना मोठ्या परीक्षेला सामोर जावं लागलं.... पण ही लोकप्रियता होती..... एक सर्व सामान्य कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री आणि आता सलग चौथ्यांदा आमदार झालेल्या लोकनेत्याच्या प्रवासाचा तो जणू धावता आढावा होता.... असामान्य असून हि सर्वमान्य असणाऱ्या या लोकनेत्यानं लोकांना भेटता यावं म्हणून सर्वसामान्यांप्रमाणे पायी चालणं पत्करलं आपल्या आनंदात त्यांना सहभागी करण्यापेक्षा त्यांच्या आनंदात स्वतः सहभागी होणं त्यांनी पसंत केलं.... जन समुदायाची जणू ती एक लाट होती ....ती लाट होती लोकप्रियतेची.... अगणित लोकं रस्त्याच्या दुतर्फा आणि रस्त्यामध्ये असलेल्या डीव्हायडरवर उभे होते ... अर्थात त्यांच्या लाडक्या नेत्याला मानवंदना देण्यासाठी.... 

आपलं मत सत्कारणी लागल्याचे समाधान त्या गर्दीत समाविष्ट असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं....  आणि आपण किती जरी मोठे झालो असलो तरी डोंबिवलीकरांसाठी अजूनही रविदादाच आहोत हे असं समाधान दादांच्या चेहऱ्यावरही दिसत होतं.... त्या विजय पदयात्रेत जनतेचा म्हणजे लोकांचा लोकनेत्यावरती असलेला विश्वासच जणू ओढून आणून त्यांना समाविष्ट करत होता.... लाडक्या लोकनेत्यावर ही महाराष्ट्राची जबाबदारी.... आणि त्यामुळे विजयी होण्याच्या दृष्टीने शंभर टक्के व्यक्तिशः लक्ष देणं केवळ अशक्य आणि म्हणूनच त्यांच्याही चेहऱ्यावर एक समाधान आणि विश्वास दिसत होता कार्यकर्त्यांवर असलेला आणि मुख्य म्हणजे जनतेवर असलेला..... गुलालात न्हालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं..... आपल्या मेहनतीचं चीज झाल्याचं...... सर्वांच्या मनातला नेता आज ताठ मानेने स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवून रस्त्यावर चालत निघाला होता.... नमस्कार करत होता...... प्रसंगी वर बघून हात हलवत सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा स्वीकारण्यासाठीच तो चालत होता......... आदिवासी जनतेच्या उद्धारासाठी स्वतःच्या मालकीची जमीन दान करणारा कोकणचा सुपुत्र, सढळ हस्ते सत्पात्री दान देऊन आज पायी चालत होता.... एकीकडे दही हंडी उत्सवाचं स्वरूप बदलत असताना स्पर्धेत रुपांतर होत असताना आनंद उपभोगता यावा म्हणून थर मर्यादा घालणारा, गोविंदांचा विमा उतरवून घेणारा आणि अति उत्साही गोविंदांना “सेफ्टी बेल्ट लावा अन्यथा थर न लावता मानधन घेऊन जा” असं काळजीपोटी पोटतिडकीनं सांगणारा लोकहित दक्ष नेता आज रस्तावरून चालला होता.... पोलिसी सैनिकी प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून देणारा नेता आज त्यांच्यात सामील होऊन रस्त्यावर चालत होता... प्रसंगी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणारा नेता आज रस्त्यावरून चालत होता....जनतेला आनंद मिळावा म्हणून... त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी..... विरोधकांनी केलेल्या चिखल फेकीमुळेच कमळ अधिक जोमानं फुललं होतं.....आणि तो आनंदच चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता... प्रथम राष्ट्र.... नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे जाणणारा आणि जगणारा नेता रस्त्यावरून चालत होता..... समस्या कोणती ही असो कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक.... या समस्यांचा विचार करून त्या योग्य पद्धतीने सोडवणारा लोकनेता आज रस्त्यावर चालत होता.... प्रसंगी समोर आलेला कोणत्या पक्षाचा आहे? याचाही विचार न करता त्याचे काम करणारा माणुसकी जपणारा, माणुसकीला प्रथम प्राधान्य देणारा जनतेचा जाणता राजाच जनतेसोबत आज रस्त्यावरून चालत होता.  प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा नेता, हात गगनाला भिडत असतानाही  जमिनीवर खंबीरपणे पाय रोवणारा नेता त्याच्या जनतेसाठी आज रस्त्यावरून चालत होता... 

जनता आणि लोकमान्य लोकनेता यांच्या मधलं हे नातं मोठं अलौकिक होतं.... आहे आणि राहिल..... हे नातं राहणार आहे अबाधित..... कारण ते आहे सलोख्याचं....जिव्हाळ्याचं.... प्रेमाचं.....आणि मुख्य म्हणजे विश्वासाचं....

                                                             संतोष आठवले 

                                                            ९३२३७९९८१९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या