कविता, - निकाल लागला




 निकाल लागला

गुलाल उधळला

कालपर्यंत असणारा 

'मतदार राजा'

आज मात्र गरीब झाला....


महायुती आणि महविकास आघाडी

करता करता कार्यकर्ता अटक झाला

कालपर्यंत असणारा 

 'मतदार राजा'

आज मात्र गरीब झाला...


बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी 

नेहमीप्रमाणे आश्वासनांचा विसर पडला

कालपर्यंत असणारा 

'मतदार राजा'

आज मात्र गरीब झाला....


लाडकी बहीण काय आणि खंबीर युवा काय

सुरक्षिततेचा हक्क कोणालाच नाही मिळाला

कालपर्यंत असणारा 

'मतदार राजा'

आज मात्र गरीब झाला...


सरकारच डोकं ठिकाणावर आहे काय?

असा खणखणीत प्रश्न विचारणारा

आता कुठे सापडायचा नाही..


 एक मात्र लक्षात ठेव 

जागरूक नागरीका..

राष्ट्राय स्व:

हे तत्त्व सोडायचे नाही...



कु.शांभवी शेंडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या