वाचन प्रेरणा दिवस संपन्न...





मुंबई प्रतिनिधी

(सुभाष हांडे देशमुख)


महाराष्ट्र विद्या विकास मंडळ कुर्ला संचलित शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय नेहरू नगर कुर्ला पूर्व येथे मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने ' वाचन प्रेरणा दिन ' साजरा करण्यात आला.संस्थेचे सचिव सत्येंद्र सामंत यांच्या शुभहस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 


विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या प्रसंगी शाळेच्या सभागृहात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले.शाळेचे विद्यार्थी पालक व शिक्षकांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सामंत, खजिनदार स्नेहल सामंत, शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती नेमाडे  उपमुख्याध्यापक लक्ष्मण भोये पर्यवेक्षक श्स्मिता कर्पे, दीप्ती घाटे, कावेरी मांढरे, ग्रंथपाल माधुरी चुरी शिक्षक उद्धव अमुप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या