सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दक्षिण मुंबई प्रादेशिक कार्यालयात ‘हिंदी माह’ चा शुभारंभ

*सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दक्षिण मुंबई प्रादेशिक कार्यालयात ‘हिंदी माह’ चा शुभारंभ* 
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दक्षिण मुंबई प्रादेशिक कार्यालय, स्टैण्डर्ड बिल्डिंग,  फोर्ट येथे ‘हिंदी दिवस’च्या पूर्व संध्येला दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी ‘हिंदी माह’ चा शुभारंभ कार्यक्रम साजरा झाला. यावेळी पारंपारिक पद्धतीने  प्रादेशिक प्रमुख श्री बिरेन्द्र मेहता यांनी दीप-प्रज्ज्वलन केले.  यावर्षी भारत सरकारच्या आदेशानुसार ‘हिन्दी माह’ १४ सप्टेंबर २०२४  पासून १४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.  या शुभप्रसंगी राजभाषा – हिन्दी  मध्ये सुविचार पोस्टरांचे अनावरण करण्यात आले. तसेच  'हिन्दी मुहावरों का अर्थ एवं वाक्य प्रयोग लेखन  प्रतियोगिता' अशी पहिली स्पर्धा आयोजित केली.
प्रादेशिक प्रमुख श्री बिरेन्द्र मेहता  नीं आपल्या भाषणात हिन्दी भाषेच्या माध्यमाने बँक-व्यवसायात अधिकाधिक वृद्धि होत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राजभाषा हिन्दीचे महत्व समजावले व नेहमीच्या बैंकिंग कार्यात राजभाषा हिंदीचा प्रयोग करावा आणि आपल्या देशाची उन्नति होण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. कर्मचा-यांनी आपले दैनंदिन कामकाज हिन्दी माध्यमाने करण्याचा संकल्प केला. हिन्दी माह मध्ये होण्या-या विविध हिन्दी स्पर्धांमध्ये सर्व कर्मचा-यांना  सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. मुख्य व्यवस्थापक, श्री किसन लबडे यांनी हिन्दी दिवसच्या निमित्ताने बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीइओ श्री एम.वी.राव  यांचा संदेश वाचून दाखवला.  सुश्री कुमारी ऋतुराज, मुख्य व्यवस्थापक यांनी आभार प्रदर्शन प्रस्तुत केले. या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन डॉ. रेवती कृष्णा आळवे, सहायक व्यवस्थापक-राजभाषा यांनी केले. या कार्यक्रमात सर्व कर्मचारीवर्गांने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या