नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार - २०२४ सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न






 प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने मुंबई वांद्रा पश्चिम येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता  विविध क्षेत्रतील मानवरांना  प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवि बाळासाहेब तोरस्कर यांनी भूषवले ' उद्घाटक मा प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार डॉ. खं . रं . माळवे खरमा . मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आले . त्याच प्रमाणे स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे मुंबई यांनी आपल्या संविधानाच्या उद्देशिका वाचन केले आणि  त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले व  मान्यवराचा सन्मान केला . करणार यावेळी प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉ डी .जी  यादव डॉ डेरिक एंजल्स ' डॉ सुकृत खांडेकर ' श्री भानुदास केसरे ' प्रमोद महाडीक ' रामकृषण कोळवणकर ' राजेश कांबळे , डॉ गॅन्सी अल्बुकर्क आदि मान्यवर उपस्थितीत होते . यावेळी नवोदित कविंच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले . तसेच या कार्यक्रमात साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक , पत्रकारिता, संपादकीय,, ' वैद्यकीय, कला , नाटय , नवोदित  अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८७ हून अधिक मान्यवरांना  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .अक्षरश्री विलास देवळेकर यांनी नावावरुन कविता फ्लॅक्सने, पुरस्कार्थींचे लक्ष वेधून घेत होते. आणि बऱ्याच जणांनी त्या कवितेसोबत फोटोही काढले. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा ही वाढली. या कार्यकमाचे आयोजन नॅशनल लायब्ररी ' पी .बी ई सोसायटी नाईट कॉलेज  ' वर्ल्ड व्हिजन संस्था , लेखक रमेश पाटील ' प्रमोद सुर्यवंशी योगेश हरणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या