१०० वर्षांची परंपरा लाभलेला मरुबाई गावदेवीचा दहीहंडी उत्सव

 



 मुंबई- गेल्या १०० वर्षांहून  अधिक काळापासून साजरा  होत असलेला माटुंग्यातील श्री मरुबाई गावदेवी मंदिर देवस्थानचा दहीहंडी उत्सव यंदा मंगळवार २७ ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे.

मुंबईच्या विविध भागांमधून सुमारे ५० हून अधिक गोविंदा पथके पहिली मानाची म्हणून दहीहंडी फोडण्यासाठी या मंदिरात येणार आहेत.


श्री मरुबाई गावदेवी मंदिर देवस्थानचे विश्वस्त अनिल गावंड आणि मधुकर गावंड यांनी सांगितले की,हे मंदिर दहीहंडी उत्सव साजरा  करणारे एक प्राचीन आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. याठिकाणी माटुंगा,सायन ,

दादर,लालबाग,कोळीवाडा,परळ आणि वडाळा व इतर ठिकाणची ५० हून अधिक गोविंदा पथके या मंदिरात शक्तिदेवीला अभिवादन करण्यासाठी येतात.ही पथके सुरक्षित आणि यशस्वी उत्सवासाठी देवीकडे मागणी करून पुढील दहीहंडी फोडण्यासाठी मार्गस्थ होत असतात.यावेळी परंपरेनुसार

प्रत्येक गोविंदा पथकाला मंदिर देवस्थानकडून एक ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या