थोर समाजसुधारक, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी, देवदासी प्रथा बंद करण्यासाठी, सार्वजनिक ठिकाण, पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याबाबत अनेक समाज सुधारनेचे कायदे बनविणारे तसेच कोकण रेल्वेसाठी प्रस्ताव मांडणारे भंडारी समाजाचे मानबिंदू लोकहितवादी रावबहाद्दूर सि. के. बोले यांची २९ जून रोजी १५६ वी जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्ताने तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने कला,सामाजिक कार्य, विज्ञान, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, नागरिक सेवा, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भंडारी मंडळ दादर, मुंबई व सर्व समाज ओ. बी. सी. आघाडी यांच्या वतीने लोकहितवादी रावबहाद्दूर सि. के. बोले पुरस्कार २०२४ चा समाजभूषण पुरस्कार नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे चिटणीस /मुख्य संघटक श्री.अमोल मडामे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल नशाबंदी मंडळाचे पदाधिकारी व जिल्हा संघटक तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सर्व स्तरातून अमोल मडामे याचे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या