श्रीमती कविता घोष रौप्यपदकाने सन्मानित

 श्रीमती कविता घोष रौप्यपदकाने सन्मानित




प्रतिनिधी (नवी मुंबई ) सुभाष हांडे देशमुख:


नवी मुंबई : भारतातील गुरुग्राम येथे अकराव्या वी जीएसआईएफ केटल बेल ही स्पर्धा दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी,  फिटोनिक फिटनेस सेंटर , गुरुग्राम, हरयाणा येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. राष्ट्रीय स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या स्पर्धेत भारतातील ११ राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यात महाराष्ट्रातून  श्रीमती कविता घोष यांच्याबरोबरच साजिद अली, भीबा सिंग, निलेश दुबे आदी स्पर्धक सहभागी झाले होते. सहावी डब्ल्यू के एस एफ इंडिया इंटरनॅशनल ट्रॉफी असे संबोधित करण्यात येत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत १०४ खेळाडूंनी भाग घेतला. याच राष्ट्रीय स्पर्धेत मुंबईतील कविता घोष यांनी आपली क्षमता, मेहनत व कौशल्याच्या बळावर उत्कृष्ट कामगिरी केली आणि पारितोषकाची मानकरी ठरली. आणि रौप्य पदक देऊन तिचा यथायोग्य सन्मान करण्यात आला. कविता घोष मुख्य प्रशिक्षक पराग म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.



महाराष्ट्र राज्यासाठी रौप्य पदक मिळविणाऱ्या कविता घोष यांनी एका हाताने दीर्घ काळ (१०मिनिटे) १६ किलो ची केटलेबेल  ७५ वेळा खाली न ठेवता उचलली. तसेच ३० मिनिटे मॅरेथॉन स्पर्धेमध्येही सहभागी होऊन,  ३०० वेळा रिप्स करून उच्चांक केला आणि यातही रौप्य पदकाच्या त्या मानकरी ठरल्या. 


केटल बेल स्पोर्ट ही केटल बेल उचलण्याची एक अशी शैली आहे की,  जी ताकद व सहनशक्तीवर केंद्रित आहे. या स्पर्धेत लिफ्टर्स केटल बेल खाली न ठेवता ठराविक वेळेत विशिष्ट केटल बेल लिफ्टच्या शक्य तितक्या मोजलेल्या रेपटेशन्स पूर्ण करण्यासाठी स्पर्धा करतात.  रशियाच्या राष्ट्रीय खेळात केटल बेल खेळाचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या