भालचंद्र माने. नेरूळ,नवी मुंबई
१०एप्रिल२०२४. जुई नगर,नवी मुंबई येथे उत्साहात साजरा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव अनेकांना येत आहे. जगाच्या कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे लोकांना भक्ती मार्गात आणण्यासाठी अनेक अनुभव देऊन आपले भक्त निर्माण केले. त्याचीच प्रचिती अनेकांना अनेक ठिकाणी अनुभव येत आहे. अनेक लोकांना अक्कलकोट ला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाण्यास काळ वेळ अभाव असल्या कारणाने जाऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थांचा मठ संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष सुतार साहेब यांनी स्वामी भक्तांना नवी मुंबई येथे एक उत्तम असे शांत प्रसन्न वातावरणात मनमोहक मूर्ती स्थापन करून नित्यनेमाने पूजा अर्चना, दर गुरुवारी व विशेष दिवस महाप्रसाद ,धार्मिक सामाजिक अशा अनेक विविध कार्यक्रमाने श्री स्वामी समर्थ मठ ,भारत सोसायटी समोरील सेक्टर 25 जुई नगर येथे लोकांना भक्तांना अक्कलकोट येथे आल्याचा एक जागृत अनुभव येत आहे .त्याचाच परिणाम म्हणून आज हजारोच्या संख्येने भक्तगण श्री स्वामी समर्थ मठात येत आहे .
त्याच्या जोडीला सचिव श्री. प्रदीप पाटील सर उत्तम प्रकारे सर्व कार्यक्रमाचे नियोजन करून भक्तांमध्ये तसाच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात सलोखा ठेवून मठाची प्रगती करत आहे. स्वामी भक्त सेवेकरी जेवणाच्या पंक्तीतील भांडी ताटे धुणे घासण्यापासून महाप्रसाद करण्यापर्यंत, साफसफाई ,झाडलोट स्वच्छता राखण्यापासून सुंदर असा परिसर डेकोरेशन त्याचबरोबर येणाऱ्या भक्तांना सुलभपणे व्यवस्थित दर्शन,महाप्रसाद वाटप करण्यासाठी सेवकरांची विशिष्ट पद्धतसह आपल्यावर नम्र वाणीतून नियंत्रण करतात.आपल्या स्वामींची सेवा हा भाव ठेवून स्वामी भक्त सेवा करत असतात. मठातील सर्व कार्यक्रम स्वेच्छा निधीवर चालेले असतात. अभिषेक पूजा, दर्शन अशा कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही . भक्तं मनमोकळे आनंदाने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट .जुईनगर, संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष सुतार साहेब.व सचिव श्री. प्रदीप पाटील सर साहेब, पदाधिकारी , महिला तसेच पुरुष सेवेकरी यांचे अनेक आभार .

.jpeg)

0 टिप्पण्या