अभिनेत्री राजश्री काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !


 

अभिनेत्री राजश्री काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !


काल दुपारी डोंबिवलीत, मराठी- हिंदी नाट्य- चित्रपट अभिनय क्षेत्रातील जेष्ठ अभिनेत्री राजश्री काळे मॅडम, आपली दुःखद बातमी ऐकून, धक्काच बसला. आपण, गेल्याच जानेवारी २०२४  महिन्यात, आपण माझ्या विनंतीला मान देऊन, आयकर भवन मध्ये, "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सांगता सोहळा" निमित्ताने आला होतात. आपण, आयकर भवनच्या 'जुन्या आठवणी' सांगितल्यात. सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात 'आनंद' व्यक्त केले. आपण नाट्य- चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलात. आपण स्वामी समर्थ ची पुजा न विसरता करता, तेवढीच साईलीला ही मानता. आपले पती, बाळ भिमराव नसताना, लाडाने डार्लिंग डार्लिंग हाक मारीत. ते ऐकून, आपले मन उधाण वाऱ्याचे होत. आपण सगळ्यांना अभिमानाने सांगत, बुवा तिथे बाया. पण माझा पती सोडून, बाकीचे पती सगळे उचापती आहेत. आपल्या शेजारचा मामा येरा झायला. त्याची समजूत काढत म्हणालात, असं धुमशान न घालता लढा शिक्षणाचा. आपल्या होणाऱ्या सूनेला चार दिवस सासूचे गोष्टी सांगत. आणि म्हणत, मुलगी शिकली प्रगती झाली. तसेच सगळ्यांना सांगत, या सुखानो या चं रहस्य. कारण की, आपण स्वतः सदा हसमुख आणि सर्वांशी मिळून मिसळून राहत. आपण, परिक्षक/सेलिब्रिटी/सुत्रसंचालक म्हणून आपल्याला ना गर्व ना अभिमान.

      आपले येणारे चित्रपट, बाबल्याक देव पावलो, रेतीवाला नवरा पाहिजे, पारड, दृष्टी, हिंदीत- प्यार करो बार बार, रोटी. आणि प्रदर्शित झालेले चित्रपट २६) मराठी चित्रपट, २७) हिंदी चित्रपट, ७६) मराठी नाटकं, १२) हिंदी नाटकं, ३६) मराठी मालिका, ९) हिंदी मालिका आणि, ४६) शाॅर्ट फिल्म. आपणास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

          आपणास काल सकाळी चालता बोलता, छातीत कळा येत असता,उपचारासाठी नेत असताना, आपणास हृदयाचा झटका आला, आणि आपल्या वयाच्या ५२व्या वर्षी, आपली अर्ध्या रस्त्यात प्राणज्योत मावळली. आपल्या परिवारास हे 'दुःखाचे डोंगर' सहन करण्याची शक्ती लाभो, आणि आपल्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली "आयकर कर्मचारींच्या" वतीने वाहत आहे.


                     विलास देवळेकर 😞

                 आयकर भवन- मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या