सहकारी व्यवस्थापन पदविका प्रमाणपत्र (DCM ) परीक्षेत गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ..



गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण ..

मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे अंतर्गत मुंबई सहकारी प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने सत्र पाचवे माहे डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सहकारी व्यवस्थापन पदविका प्रमाणपत्र परीक्षेत चा निकाल 99.99% लागला असून सहकारातील गाड्या अभ्यासक गुणवंत कामगार व प्रमाणित लेखापरीक्षक प्रभाकर काम काळे कांबळे यांनी सहाशे पैकी 441 गुण प्राप्त केले असून त्यानी 73.50% मार्क मिळाल्याने ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन मुंबई केंद्रात त्यांचा पाचवा क्रमांक आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 

             प्रभाकर  कांबळे हे टागोर नगर विक्रोळी येथे राहत असून त्यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा "गुणवंत कामगार पुरस्कार " मिळालेला असून त्यांना पत्रकारिता सामाजिक व सहकार क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय , जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय 200 हून  अधिक पुरस्कार मिळालेले असल्याने त्यांना वनिता फाउंडेशनच्या अध्यक्ष  वनिता प्रभाकर कांबळे उपाध्यक्ष सुनील निकाळे प्रमाणित लेखापरीक्षक राजेंद्र जाधव ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र कांबळे ,श्रीपाल कांबळे तसेच सहकार केंद्राचे प्राचार्य एस एस धरणे उपप्राचार्य एम बी फाळके प्रा. अनंत बोंबले प्रा. आर आर  निंबाळकर प्रा. पी  जी  गायकवाड आदी मान्यवरांचे फार मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने त्यानी डी.सी.एम. परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या