धारावीची शान,मुंबईची जान,कोकणचा अभिमान,समाज भूषण गणेशभाऊ खेडेकर....


 धारावीची शान,मुंबईची जान,कोकणचा अभिमान,समाज भूषण गणेशभाऊ खेडेकर....



धारावीतील जेष्ठ समाजसेवक गणेशभाऊ खेडेकर संत रविदास समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.

धारावीतील जेष्ठ समाजसेवक गणेशभाऊ खेडेकर यांना बृहन्मुंबई महानगर पालिका आणि संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती यांचा संत रविदास समाज भूषण पुरस्कार २०२४ खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले १६/०३/२०२४ मार्च रोजी  शारदा मंगल कार्यालय दादर येथे पुरस्काराचे सोहळ्याचे वितरण करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास नगरसेविका मुंबईशहराची माजी महापौर स्नेहलताई आंबेकर, समितीचे अध्यक्ष सूर्यकांत आंबेकर,चर्मकार आणि मनसे नेते कवी साहित्यिक शांताराम कारंडे,रोहिदास समाज पंचायत संघाचे अध्यक्ष मयूर देवळे  आणि चर्मकार समाजातील विविध संस्था संघटनांच्या पदाधिकारी,सदस्य तमाम नागरिकांच्या उपस्थितीत होते..तळागाळातील लोकांच्या सर्वोतोपरी समस्यांचे निराकरण करण्यात अग्रेसर असणारे,समाजातील लोकांची समस्या निस्वार्थीपणे सेवा करणारे रोहिदास समाज पंचायत संघ यांच्या स्थानिक पंचायत सरचिटणीस, अध्यक्ष, विभागीय कोषाध्यक्ष, आणि इतर अनेक सामाजिक मंडळ, संस्था, संघटनांचे विविध पदांवर कार्यरत असणारे, इंडिया कर्मचारी महाराष्ट्र शासनाचे वीस वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी असणारे गणेशभाऊ खेडेकर यांचा संत रविदास समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने समाजात आनंद आणि समधान व्यक्त करण्यात येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या