ठाणे येथे महिला दिन उत्साहात साजरा !



नुकताच  ठाणे मराठी ग्रंथालय येथे महिला दिनाचे औचित्य साधून ध्यास कवितेचा काव्य मंच व अक्षर चळवळ आणि डॉक्टर राजेश मढवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते . थोडं तिच्या मनातलं "कार्यक्रम खूपच छान झाला.संदेश भोईर सर अरुण म्हात्रे सर ,जयंत पाटील जी नमिता ताई  कीर प्रतिभाताई मढवी स्नेहा राणी या सर्वांनी   सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते  .शिल्पाताईचे निवेदन खूप सुंदर सुंदर झाले  नमिता ताई,अरुण म्हात्रे सर यांचे मनोगत छान झाले .🙏💐 तसेच सर्व कवयत्री मैत्रिणींनी सुंदर सुंदर कविता सादर केल्या  .  काहींनी ललित लेख  सादर केले यामध्ये सुनिता काटकर माधुरी बागडे स्वाती शिवचरण अक्षता गोसावी कल्पना देशमुख दीपा ठाणेकर सुप्रिया पुरोहित मेघना साने प्रीती राणी जुवेकर सुजाता राऊत मेलसीना तुस्कानो छाया गोवारी ज्योती जाधव स्मिता हर्डीकर प्रज्ञा म्हात्रे सुरेखा गायकवाड संगीता कुलकर्णी स्मिता वाजेकर भारती वार्डेकर प्राची मुळीक सुप्रिता यंदे अशा ज्येष्ठ श्रेष्ठ कवयित्रींनी आपापल्या कविता सादर केल्या . स्नेहा राणी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले  . सुनीता काटकर यांनी स्वागत गीत सादर केले . कार्यक्रमाची सुरुवात नमिता ताई कीर अरुण म्हात्रे सर संदेश भोईर सर श्रीकांत पवार सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली . या कवी संमेलनात सहभाग घेतलेला कवियत्री यांचे प्रतिभाताई मढवी नगरसेविका ठाणे महानगरपालिका यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला . वेगवेगळ्या कवयित्रींच्या वेगवेगळ्या  कविता ऐकायला मिळाल्या त्यामध्ये सुनीता काटकर डोंबिवली यांनी तुझे स्वप्न मजला पडले ही कविता सुमधुर आवाजात गाऊन  सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले . स्मिता हर्डीकर यांनी घे नारी तू भरारी ही कविता सादर केली माधुरी बागडे यांनी आता नाही पेलवत तुझी गुलामी स्वाती शिवचरण यांनी सारे पाहतात तिला ओरडताना पण कुणीच नाही पाहत तिला सहन करताना संध्या लगड यांनी एक तरी लाट परतावून लावावी अशा वेगवेगळ्या कविता सादर केल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदेश भोईर जयंत पाटील श्रीकांत पवार जय म्हात्रे अरुण म्हात्रे स्नेहा राणी गायकवाड यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या