लोकशाहीर म्हात्रे यांच्याकडे सदिच्छा भेट !
महाराष्ट्राचे लाडके लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे हे भाईंदर येथे राहणारे, पण सध्या ते डोंबिवलीत आल्याचे समजताच, सध्या तात्पुरते स्थलांतर झालेले शाहीर म्हात्रे यांच्या घरी धावती भेट, समाज सेविका, कवयित्री, गायिका आणि निवेदिका सौ. सुनिता किशोर काटकर, आणि थोर समाजसेवक व जेष्ठ पत्रकार, साहित्यिक व कवी श्री शशिकांत सावंत तसेच, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक व कवी श्री विलास देवळेकर यांनी सदिच्छा भेट दिली.
ह्या भेटीदरम्यान, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाहीर म्हात्रे यांनी बालगीत कोकण गाडी आणि महाड चवदार तळेचं पोवाडा सादर केला. काही कविता ही सादर केली. कार्यक्रम संदर्भात चर्चा रंगत असताना, विचारांची देवाणघेवाण झाली. आणि शेवटी शाहीर म्हात्रे यांनी, तिघांनाही कवी वसंत बापट आणि शाहीर लीलाधर हेगडे यांचे "शिंग फुकिले रणी" हे राष्ट्रीय गीते चे पुस्तक देऊन सन्मानित केले. तसेच, चांगला पाहुणचार केल्या बद्दल, मान्यवर तिघांनी, सौ म्हात्रे वहिनी साहेबांचे आभार व्यक्त केले.


0 टिप्पण्या