जे एम एफ शिक्षण संस्थेत देखील जन गण मन इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर यांचे भव्य दिव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
सकाळच्या सत्रात जन गण मन इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम विज्ञान प्रकल्प बनवून आणले होते तर दुपारच्या सत्रात जन गण मन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यानी देखील आकर्षक व वैविध्यपूर्ण विज्ञान प्रकल्प बनवून आणले होते.
जे एम एफ मंडपम् मधे
जे एम एफ संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांचा स्वागत सत्कार झाल्यावर ,पाहुण्यांनी शास्त्रज्ञ सी. व्ही रामन व अब्दुल कलाम यांची प्रतिमा पूजन करून प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला.
जन गण मन इंग्लिश स्कूल आणि विद्यामंदिरच्या सर्वच मुलांनी त्यांच्या विज्ञान पाठ्य पुस्तकांमधील तसेच वैज्ञानिक आधार घेऊन त्यांच्या अभ्यासू आणि कल्पना शक्तीने अप्रतिम प्रकल्प बनवून आणले होते.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास ५०० विद्यार्थ्यानी सहभाग दर्शवला होता.इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अचंबित करणारे प्रकल्प बनवून आणले होते व त्याच बरोबर उत्कृष्ट रित्या स्पष्टीकरण देऊन प्रयोग करून देखील दाखवत होते.
विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे परीक्षक म्हणून वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रुचिता मोरे व प्रेरणा मिरगुळे यांनी परीक्षण केले व त्यातून उत्कृष्ट विज्ञान प्रकल्प जाहीर केले.
जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा मधून चांद्रयान प्रकल्प साठी प्रथम क्रमांक आरूष पांडे व निहरिका पांडे यांना देण्यात आला तर अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक व स्नेहा बढे (टेस्ला कोईल प्रकल्प )आरुष गुप्ता यांना देण्यात आला.
जन गण मन विद्यामंदिर चे ध्रुव पवार ( चांद्रयान ) या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला तर चारवी भगत, रेवा शिंदे , डॉली वर्मा यांनी व्होल्कॅनो प्रकल्पाने दुसरा क्रमांक पटकावला.हर्शिल पारगी, प्रथमेश माने तसेच यशमित मोरे ( अक्टी ग्राविटी प्रकल्प) यांना विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी पदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव केला.
कलामांसारखी लेखणी हातात घ्या, सी व्ही रामन सारखे शास्त्रज्ञ व्हा, जयंत नारळीकरांसारखे विचारवंत व्हा व अशा शास्त्रज्ञांचा वसा घेऊन तुम्ही त्यांचा वारसा पुढे चालू ठेवा असे प्रेरणादायी वक्तव्य करून अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी मुलांना प्रोत्साहन दिले व सर्वांच्या प्रकल्पांचे कौतुक करून त्यांना पाठिंबा दिला.
शास्त्र विषयाचे शिक्षक श्री. तेजस पाटील, सौ.अर्चना शिंगटे , सौ.मृणाल विरकुड व प्रिया दुबे यांनी विद्यार्थ्यांसाठी व विज्ञान प्रदर्शनासाठी अथक प्रयत्न घेऊन मुलांना उत्तमरीत्या मार्गदर्शन केले.
इतक्या लहान वयात स्वतः मुलांनी करून आणलेले विज्ञान प्रकल्प प्रदर्शन बघुन सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
शब्दांकन. सौ श्रेया कुलकर्णी.

.jpeg)




0 टिप्पण्या