ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ तर्फे दंतचिकित्सा व मेमरी क्लिनिक शिबिर





प्रतिनिधी ( नवी मुंबई )सुभाष हांडे देशमुख :


 नवी मुंबई : नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी  गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी संघाच्या जेष्ठ नागरिक भवन मध्ये दंतचिकित्सा शिबिर व मेमरी क्लिनिक तपासणी शिबिर आयोजित  करण्यात आले. या उपक्रमात दंतचिकित्सक डॉक्टर स्वप्नील भागवत , डॉक्टर जयश्री भागवत, डॉक्टर सिद्धांत अलुरकर, डॉक्टर अशोक जाधव यांनी आपली वैद्यकीय सेवा पुरवून सहयोग दिला.  सुमारे ७० गरजवंत ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. आणि आपली दंत व मेमरी चिकित्सा करून घेतली.



याप्रसंगी ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना डॉक्टर भागवतांनी सांगितले की, बहुतेकांच्या  मनात दंतचिकित्सेबद्दल गैरसमज आहेत व नकारात्मक दृष्टीने ते विचार करतात.  असं सांगून ते पुढे म्हणाले की, आपण कोणत्याही डॉक्टरांच्याकडे जा परंतु त्यांच्याकडून एक जागरूक  ग्राहक म्हणून दंत उपचाराची  लेखी हमी घ्या आणि ते सर्व पेपर्स जपून ठेवा. अशाप्रकारे डॉक्टरांनी जेष्ठांच्या मनात एक प्रकारे सजगता निर्माण करून त्यांना जागरूक केले.


डॉक्टर अशोक जाधव यांनी मेमरी क्लिनिक मध्ये  ज्येष्ठांची बुद्धिमापन चाचणी घेतली. आणि वयोमानासनुसार होत असलेल्या अशा प्रकारच्या आजाराबद्दल यथोचित मार्गदर्शन केले.


ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी करीत असलेल्या अशा विधायक कार्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 


ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, संघाच्या रुग्ण सेवा केंद्राचे सचिव नंदलाल बॅनर्जी यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच रुग्ण सेवाकेंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन हे शिबिर सफल केले.

------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या