"शासन आपल्या दारी" या उपक्रमात नागरिकांनी घेतला लाभ




 "शासन आपल्या दारी" या उपक्रमात नागरिकांनी घेतला लाभ 



डोंबिवली : (८ फेब्रुवारी २४) शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कल्याण डोंिवली महानगर पालिका अंतर्गत डोंबिवली पश्चिम उमेश नगर पोस्ट ऑफीस येथे माजी नगरसेविका सौ.कविता गोरखनाथ म्हात्रे, समाजसेवक गोरखनाथ उर्फ बाळा म्हात्रे,अनमोल म्हात्रे, व त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून या विभागातील नागरिकांसाठी शासकीय सर्व प्रकारच्या योजनांचे नोंदणी शिबिर गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आले होते.





नागरिकांना शासन दरबारी हेलपाटे घालावे लागतात व अनेक वेळा नागरिकांना त्रास होत असतो.तो होऊ नये या हेतूेने महारांष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी अशी योजना राबवून सर्व प्रकारचे दाखले व आरोग्य तपासणी शिबिर एकाच छताखाली राबवून नागरिकांची होणारी गैरसोय कमी केली आहे. लोकांचाही चांगला सहभाग मिळत आहे. या शिबिरात अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे.असे ही यावेळी सहाय्यक आयुक्त राजेश सावंत व समाजसेवक बाळा म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.



यावेळी महिलांनी बचत गट तयार करून व्यंवसाय करावेत, यासाठी शासन लोन देते,अशी माहिती सौ .सविता पावसकर मॅडम यांनी दिली. माजी नगरसेविका सौ.कविता म्हात्रे यांनी सबंधित अधिकारी यांचे यथोचीत सन्मान पुष्पगुच्छ देऊन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सामंत यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या