'आम्ही वडाळा पूर्वकर' परिवारातर्फे वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


 'आम्ही वडाळा पूर्वकर' परिवारातर्फे वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 


मुंबई- "आम्ही वडाळा पूर्वकर परिवार " सामाजिक संस्थेच्यावतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवीन पनवेल येथील वृद्धाश्रममध्ये जीवनावश्यक वस्तू आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. 


नवी मुंबई येथील नवीन पनवेल नेरे गावमधील गिरिजा फाऊंडेशनद्वारे संचालित वृद्धाश्रम तसेच बाल संगोपन  केंद्र येथे जावून ५० वयोवृद्ध नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.हा उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते देविदास पांजने, पोलीस बांधव भालचंद्र गायकवाड,कमलाकर ढेरे,गणेश हीवाळकर, राधेश्याम गुप्ता,राजा सिंग सिंघावले,महेश परडले,राजू जाधव,कीर्ती कारभारी, रोहित गायकवाड, किशोर परब,विशाल नलावडे, संतोष भाबल,अजीज पटेल,महेंद्र धोंडी, कमालउद्दीन पावसकर, निशांत गायकवाड,संजय हिरे,विकास कदम, अच्छेलाल गौड,दीपक भाई जयस्वाल,विनायक मीठबावकर, तसेच गिरिजा फाऊंडेशन चे बाबुराव मड्डी,साधना शेट्टी आणि अन्य काही व्यक्तींनी विशेष सहकार्य केले.आम्ही वडाळा पूर्वकर परिवार" या सामाजिक संस्थेतर्फे विविध लोकोपयोगी सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या