सामाजिक कार्यकर्ते श्री.कैलासराजे कमलाकर घरत "नॅशनल एक्सलेंट अवॉर्ड-2024"ने सन्मानित.



    पेण तालुक्यातील खारपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, कर्तृत्ववान व्यक्तीमत्त्व, शिवशंभू भक्त, शिव शंभू चरित्र इतिहास अभ्यासक, दुर्गरक्षक, व्यसनमुक्तीदूत राज्यस्तरीय कोकणभूषण, समाजरत्न पुरस्कार विजेते, महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार-2023, राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव सन्मान-2024, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार 2024" पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय पुरस्कार विजेते युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.कैलासराजे कमलाकर घरत यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल जागतिक मराठी दिनानिमित्त 25 फेब्रुवारी 2024 रोजी वेध फाउंडेशन कोल्हापूर, समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, अनुश्री महिला संस्था नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय दिपस्तंभ" कला साहित्य संमेलन ठाणे-2024 मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सरस्वती मंदिर जिल्हापरिषद समोर,पी डब्ल्यू डी. विभाग बाजूला स्टेशन रोड ठाणे (पश्चिम ) येथे "नॅशनल एक्सलेंट अवॉर्ड-2024" पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात  आला. यावेळी धर्मपत्नी सौ.मयुरी कैलास घरत, मुलगी कु.ओवी कैलास घरत कुटुंबीय सोबत होते.

    जागतिक मराठी दिनानिमित्त आयोजित कला,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गझलकार शिक्षणतज्ज्ञ मा.डॉ.लक्ष्मण शिवणेकर उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर यांच्या हस्ते पुरस्कारमुर्तीं कैलास कमलाकर घरत यांना सन्मानपूर्वक पुरस्कार वितरीत करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी म्हणून मराठी अभिनेत्री नूतन जयंत,चित्रपट निर्माती, उद्योजक, समाज सेविका नेहा निनाद धुरी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अ.ना. रसनकुटे, समजसेविका ठाणे डॉ. रागिणी चवरे ,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अध्यक्ष राजेश्री बोहरा, आयोजक डॉ.प्राध्यापक बी एन खरात संचालक समृद्धी प्रकाशन, निमंत्रक राजेश्री काळे निवड समिती, श्वेता शिर्के डोंबिवली, डॉक्टर सनी वालिका समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक कवी विलास देवळेकर उपस्थित होते.

     कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व असे उपजत गुण अंगी असलेले शिवव्याख्याते कैलासराजे घरत हे शिव शंभूचरित्र इतिहास अभ्यासक असून शिवकार्य हेच त्यांचे जीवन कार्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज यांचा खरा इतिहास विद्यार्थी, युवा वर्गाला समजावा यासाठी पॉवरपॉइंट पिपिटी द्वारे गड कसा पहावा, गाईड का असावा. ट्रेकिंगला जाताना कोणती काळजी घ्यावी सोबत काय न्यावे गडाच्या विविध भागांची नावे राजदरबार, नगारखाना, रानी महाल, बुरूज ,माची, तलाव, हौद, तटबंदी, बालेकिल्ला, बाजारपेठ, खलबत खाना,दारू कोठारे, धान्य कोठारे, झिंज्या, चिर्या, देवळी, महादरवाजा, सदर,घोड्याची पागा, हत्ती तलाव, नाणे दरवाजा, चोर किंवा दरवाजा, होळीचा माळ इत्यादी बाबी समजावून  मुलांना शिवरायांचा इतिहास समजावून देणे.

शिवशंभू जयंती उत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवशंभू चरित्र व्याख्यानमाळा, ऐतिहासिक शिवशंभू प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गडसंवर्धांचे महत्व समजावून तरुण पिढीला गडकोट स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी करत आहेत. कारण ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही तो समाज आपला इतिहास घडवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या पुढील पिढीला कळण्यासाठी गडकोटांच्या रक्षणासाठी कटिबध्द होऊया. बरेच गडकोट नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, जे उरलय ते आपल्याला जपायंच आहे.

    तर आणि तरच आपण मुलांना गडकोट प्रत्यक्षात दाखवू शकतो.अन्यथा फक्त इतिहासाच्या पुस्तकात पहायची वेळ येईल. मनुष्यसेवा हीच ईश्वर सेवा मानून तळागाळातील गोर गरीब गरजू व्यक्तीना मदत करणे, आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक पणे, निस्वार्थी वृत्तीने प्रयत्न करीत आहेत. आदिवासी वाडी वस्त्यांवर बालविवाह प्रतिबंधक जनजागृती करत आहेत.

    आजपर्यंत कैलासराजे कमलाकर घरत यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका सुरूच आहे. गेली 15 ते 20 वर्षे ते अनेक कला, क्रीडा, सामाजिक सांस्कृतिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, रोजगार मार्गदर्शन,  ,महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती,  व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा, एसएससी, एचएससी विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर,गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ, विद्यार्थि पालक शिक्षक सुसंवाद कार्यशाळा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, मधुमेह मुक्ती, नशामुक्ती, गडसंवर्धन, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, फायर अँड सेफ्टी, रोजगार मार्गदर्शन आणि सहकार्य, गड स्वच्छता अभियान असे उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत राबवित आहेत. त्यांच्या शिवकार्याची योग्य दखल घेत शिवकार्यात सदैव अग्रेसर असलेल्या योग्य व्यक्तीला समाजसेवक कैलास कमलाकर घरत यांना ""नॅशनल एक्सलेंट अवॉर्ड-2024" प्राप्त झाल्याने समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या हातून शिवकार्य आणि समाजसेवा घडत राहो ह्याच सदिच्छा. पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या