गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त व विशेष गुणवान व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न




गुणवंत विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त  व विशेष गुणवान व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न 

वृत्तांकन..प्रा.मगन सुर्यवंशी.डोंबिवली

खान्देश मराठा पाटील विकास प्रतिष्ठान डोंबिवली सामाजिक संस्था आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक वितरण , आणि सेवानिवृत्त  व विशेष गुणवान सभासद सन्मान सोहळा दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी स. ह. जोंधळे तंत्रनिकेतन सभागृह, डोंबिवली पश्चिम या ठिकाणी संपन्न झाला. 


              कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान  मा. अविनाश अरुण पाटील यांनी भूषविले तसेच , मा.  प्रकाश भिमराव बाविस्कर, मा.  नरेंद्र सूर्यवंशी, मा. अजित दादा कागदे, मा.  मधु पाटील मा. राजेश झेंडे,मा.नंदू मालवणकर व मा.सुशील सामंत यांच्या उपस्थितीने व त्यांच्या अनमोल मार्गर्शनाने कार्यक्रमाला शोभा आली.


                   सदर कार्यक्रमास योगसाधना सहज योग ध्यान केंद्र मुंबई तर्फे योगसाधना बद्दल माहिती व प्रात्यक्षिक दाखवून समाजबांधवांना सहजयोगाची  महती स्पष्ट केली.  तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह, महिलांचा हळदीकुंकू  समारंभ आणि १०० गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रतिष्ठानच्या आजीव सेवानिवृत्त तथा विशेष गुणवंत सभासदांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महिलांसाठी दोन पैठणी लकी ड्रॉ व शालेय मुलांसाठी दोन बॅग व किलबिल  बालगोपाळांसाठी बक्षिसे देऊन त्यांनाही आनंद दिला.     


        या कौतुक सोहळ्यांत प्रतिष्ठानच्या युवा, महिला कमिटी तथा विद्यमान     कार्यकारिणी,पदाधिकारी  व ५००  समाज बांधव उपस्थितीत होते.

प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.संजय पाटील सरांनी मांडले तसेच गौरव समितीचे अध्यक्ष मा.बी.एस.पाटील यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली,सचिव ,मा.गुलाबराव ठाकरे यांनी संस्थेचा लेखाजोगा मांडला ,खजिनदार मनोज पाटील यांनी समाजबांधवाना आर्थिक मदतीचे आवाहन केले  व कार्याध्यक्ष मा.प्रदीप निकम व माजी अध्यक्ष मगन सुर्यवंशी यांनी धागा बनू सूत्रबध्द कार्यक्रमासाठी सहकार्य केले.मा.शरद पाटील,मनोज बी.पाटील,मनोज एच.पाटील,श्रीकांत पाटील,कल्याण पाटील , प्रभाकर पाटील,प्रभाकर एस.पाटील,भागवत पाटील,गणेश पाटील, पदाधिकार्यांनी तथा सौ.मालती पाटील,दिपक पाटील,ज्ञानेश्वर कछवे व सर्व ज्ञात-अज्ञात समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी पार  पाडण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. महिला अध्यक्षा सौ.वृशाली पाटील यांनी शुभेच्छा  व कु.मृणाल पाटील,पुरुषोत्तम वाघ यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना शुभेच्छा व  दिल्या,अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन तर बी.आर.पाटील सरांनी आभार प्रदर्शन केले,राष्ट्रगीत झाल्यावर सर्व उपस्थित पाहुणे समाज बांधवांनी सूरुची भोजनाचा लाभ घेतला.


यावेळी प्रमुख काही मान्यवरांनी  उत्कृष्ट रीतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाबद्धल लोकसत्यवाणी न्यूजशी मुलाखत दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या