जय हनुमान क्रिकेट संघ ठरला पहिल्या पर्वाचा मानकरी.
सर्वोदय कदमवाडी क्र.२ गाव तुंबाड आयोजित "दुर्गा माता चषक २०२३" पर्व पहिले २४ संघ वाडी मर्यादित भव्य ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार दि.१० डिसेंबर २०२३ रोजी कळवा पटनी मैदान येथे संपन्न झाले.. सदर स्पर्धेत समाविष्ट सर्व खेळाडू आणि क्रिकेट संघांनी उत्कृष्ठ खेळी केली." दुर्गा माता चषक " २०२३ पहिल्या पर्वाचा मानकरी ठरला.जय हनुमान क्रिकेट संघ बहिरवली देऊळवाडी या संघाला श्री तुकाराम घडशी आणि सौ. सरस्वती घडशी या मान्यवरांच्या हस्ते मानाचा " दुर्गा माता चषक " २०२३ देण्यात आला. तर रजवेल रायडर्स ह्या संघाला उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं..अनुक्रमे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला जय बजरंग बली क्रिकेट क्लब कोंडवाडी.
समाविष्ट सर्व संघांनी उत्कृष्ठ खेळी आणि सहभाग नोंदवून सर्वोदय कदमवाडी क्र.२ च्या मंडळास सहकार्य केले. सदर स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळीनी उपस्थिती दाखवली होती तसेच अनेक दानशूर नेतृत्वाच्या देणगी आणि सहकार्याने ही स्पर्धा पूर्णत्वास गेली. सदर स्पर्धा ही परिपूर्ण होण्यामागे आमचे गाव मंडळ, मुंबई मंडळ तसेच महिला मंडळ यांचे खूप मोठे योगदान लाभले. स्पर्धेचे संपूर्ण समालोचन हे श्री.शरद कदम गुरुजी, श्री विलास घडशी आणि प्रकाश गुरव दादा यांच्या सुमधुर वाणीतून लाभले. दुर्गा माता चषक यशस्वी नियोजन पार पाडण्यात सर्वोदय ११ संघाचे कर्णधार श्री. सचिन घडशी , उपकर्णधार कु. अजय घडशी आणि संघाचे सर्व खेळाडूंचे खूप मोठे योगदान आहे. सदर स्पर्धा ही श्री. जानू कदम, श्री धोंडू कदम, श्री. राजेंद्र घडशी, श्री. अनिल कदम,श्री. नंदकुमार घडशी, श्री.सहदेव कदम, श्री.युवराज कदम, श्री.प्रकाश कदम, कु.गणेश कदम, श्री संतोष शिगवण, श्री. संदीप घडशी, श्री. दिनेश कदम आणि वाडीतील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.तरी सर्वोदय कदमवाडी क्र.२ मंडळाच्या वतीने सर्व शिलेदारांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.


0 टिप्पण्या