मुंबई उपनगर - घाटकोपर उत्तरपूर्व मुंबई लोकसभा केंद्र सरकार व महाराष्ट्रातील खोके सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होऊ दे चर्चा अभियानंतर्गत भांडाफोड.

 


मुंबई उपनगर - घाटकोपर उत्तरपूर्व मुंबई लोकसभा केंद्र सरकार व महाराष्ट्रातील खोके सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होऊ दे चर्चा अभियानंतर्गत भांडाफोड.


घाटकोपर मुंबई ०५ ऑकटोबर २०२३: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील होऊ दे चर्चा या अभियानाची सुरुवात अवघ्या महाराष्ट्रात सुरु आहे. त्यानिमित्त शिवसेना शाखा क्र.१३० घाटकोपर मुंबई च्या वतीने घाटकोपर रेल्वे स्टेशन येथे वेलकम हॉटेल समोर 

 होऊ दे चर्चा व करूया केंद्र शासनाच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्यावेळी कडवट व निष्ठावंत शाखाप्रमुख श्री.रोहिदास ताठेले यांनी शासनाच्या बोलघेवड्या योजनेचा भंडाफोड करून भारत जलाव पार्टीने म्हणजेच बीजेपी ने भारतातील प्रत्येक माणसास फसविले आहे हे उदाहरणासहित जनतेस समजावून सांगितले. याप्रसंगी घाटकोपर पूर्व विधानसभा प्रमुख श्री.अवि राऊत व श्री.भूषण चव्हाण, युवासेना मुंबई समन्वयक इम्रानभाई शेख, मा.नगरसेवक श्री.कुमार पांडे पाटील तसेच महिला विधानसभा प्रमुख कविता फर्नांडिस; महिला शाखा संघटिका नंदा काळे; शाखा समन्वयक सूर्यकांत शिंदे; ; युवासेना उपविभाग अधिकारी हेमंत वालझाडे; युवासेना शाखाधिकारी निलेश येवले; ग्राहक संरक्षण कक्ष उप-संघटक श्री.प्रमोद ज्ञानोबा चौंडकर; वार्ड संघटक संतोष भोईटे; उपशाखाप्रमुख विकास माने; हरेश यादव व शिवसेना महिला आघाडी शिवसेनेच्या रणरागिणी व शिवसैनिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या