एअरपोर्ट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टल आर्ट गॅलरीत

 

एअरपोर्ट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टल आर्ट गॅलरीत   

एअरपोर्ट हायस्कूल माध्यमिक विभाग व प्राथमिक विभाग, विलेपार्ले यांच्या विद्यमाने ३० विद्यार्थ्यांचे  चित्र प्रदर्शन दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पंचतारांकित हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टल,जे बी नगर,अंधेरी येथे आयोजित केले आहे.प्रदर्शनात इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे प्रदर्शित केली आहेत. कला शिक्षक भागवत सपकाळे सर  यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी भविष्यात त्यांचे करिअर कलेच्या माध्यमातून घडावे,ही दूरगामी दृष्टीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे.चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी एअरपोर्ट हायस्कूलचे माननीय सचिव श्री आनंद साधू सर एअरपोर्ट हायस्कूलचे मुख्याध्यापक,माननीय श्री वसंत निंबाळकर सर ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  सौ रेचल तंगया , वरिष्ठ शिक्षक श्री नेताजी चौगुले सर यांची उपस्थिती लाभणार आहे 

इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे वेगवेगळे माध्यमातून उपयोग करून चित्र  रंगवले आहेत , त्यात गणपतीचे,निसर्ग चित्रे  अशा विविध माध्यमातून  विद्यार्थ्यांनी चित्रे रंगवलेले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या