जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर.जे एम एफ बाळ गोपालांची कृष्ण जन्माष्टमी.


  

" लाख असतील कृष्ण कालिंदी च्या तटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला."

      जे एम एफ संस्था संचालित जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर येथे श्री कृष्ण जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

      सर्वच बाळ गोपलांचे आकर्षण म्हणजेच त्यांचा लाडका आवडता मित्र ' कृष्ण '.

आज श्रीकृष्ण जयंती त्यामुळे आमच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी राधा, कृष्ण गोपिका,देवकी ,यशोदा ,तसेच कृष्णाचे लाडके मित्र पेंद्या, ग्वाला असे अनेक वेषभूषेमधे सजून आले होते.

      कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सर्वेसर्वा आचार्य महोदय डॉ राजकुमार कोल्हे सर, सचिव डॉ प्रेरणा कोल्हे मॅडम, खजिनदार जान्हवी कोल्हे मॅडम,मुख्याध्यापक व इतर पदाधिकारी यांनी कृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून व संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी व त्यांचे इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी नी अतिशय सुंदर असे कृष्ण भजन गाऊन केली.


    मान्यवरांचे स्वागत करून प्रमुख पाहुणे डॉ राजकुमार कोल्हे सर यांनी कृष्ण जन्माष्टमी ची थोडक्यात गोष्ट सांगितली ,त्याच बरोबर सचिव डॉ प्रेरणा कोल्हे मॅडम यांनी कृष्णाचे दोन ओळी गाणे गाऊन त्याचा सुंदर अर्थ देखील सांगितला.

          छोटी मुले ही कृष्णाचे च रूप असतात, दही ,दूध ,लोणी जसे कृष्णा ला खायला आवडायचे तसेच ह्या छोट्या मुलांनाही फार आवडते.कृष्णाच्या गोष्टी आपण नेहमीच ऐकतो ,ऐकत आलेलो आहोत ,परंतु प्रत्यक्ष कृष्णा बरोबर खेळ खेळणे,त्याच्याशी संवाद साधणे, रासलीला रचणे याचा आनंद च काही वेगळा आहे. असाच आनंद देण्यासाठी एक सुंदर कृष्णलीला नाटिका सादर करण्यात आली.

     इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्मापासून ते रासलीला पर्यंत अतिशय रोचक अशी ही नाटिका सादर केली.हिंदी शिक्षिका सौ कविता गुप्ता ह्यांनी नाटिका लिहली असून स्वतः त्यांनी व नाट्य शिक्षक श्री प्रमोद पगारे यांनी दिग्दर्शन केले, रासलीला नृत्य दिग्दर्शन नृत्य शिक्षक श्री अभिषेक देसाई यांनी केले.

       सर्व च मुलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ' दहीहंडी '.

जन गण मन शाळेची आणि जे एम एफ संस्थेची अशा दोन दहीहंडी बांधण्यात आल्या व प्रचंड उत्साहात, जल्लोषात कृष्ण बनून आलेले बाळ गोपाळानी थरावर थर चढून दहीहंडी फोडली व त्यातूनच चॉकलेट ,गोळ्या, बिस्कीट,फळे ह्यांची मेजवानी त्यांना मिळाली.


           कार्यक्रमाच्या शेवटी गरबा,रासलीला करताना ' मधुबन वातानुकुलीत दालनला जणू वृंदावन, मथुरे चे स्वरूप आले होते. सगळीकडे कृष्ण आणि राधा दृष्टीस पडत होते.

    हा सर्व नजरा पाहून कदाचित कृष्णालाही बासरी वाजवण्याचा मोह आवरला नसेल .

    सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यामंदिर शाळेचे इयत्ता सहावी आणि आठवी चे विद्यार्थी उत्कर्ष पांडे व वेदिका चौगुले यांनी शिक्षिका सौ निमा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मविश्वासाने केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या