डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवलीच्या शतक महोत्सवीवर्षी, आराधना नृत्यालयाचा नवधा भक्तीवर आधारित नृत्याविष्काराला उदंड प्रतिसाद।
डोंबिवली : श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली यांचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २६ ऑगस्ट रोजी स्मिता मोरे संचालित `आराधना कथक नृत्यालय, डोंबिवली यांचा `नवधा भक्तीवर' आधारित नृत्य रंचना व नृत्यनाटिकेचा रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्मिता मोरे यांच्या मृदुंग वादनाने झाली. त्यानंतर नृत्यालयाच्या कलावंतांनी गणेश वंदना, षंडाक्षर स्त्रोत्रम् यासोबत `प्रगटे अवध में राम' ही नृत्यनाटीका सादर केली. कलावंतांच्या या मंत्रमुग्ध करणार्या नृत्यनाट्य ब नृत्याविष्काराने उपस्थित रसिक प्रेक्षक भारावून गेले. `श्री गुरुचरण रज' या दास्यभक्तीवर आधारित नृत्य रचनेला रसिकांची विशेष दाद मिळाली. लहान हनुमान झालेला बालकलाकार कु. जयराज रितेश ढोमसे याने रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
देशभक्तीवर आधारित `वंदे मातरम' या गीतावरील नृत्य रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली. सहभागी सर्वच कलाकारांचा यात सहभाग होता,रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन स्मिता मोरे यांचे होते. कार्यक्रमाचे कल्पक व सुंदर नृत्य दिग्दर्शन विनोद कोरी यांनी केले, तर या कार्यक्रमाचे सूत्रधार शिवाजी शिंदे व इंग्रजीत मोरे हे होते. वेशभूषा व रंगभूषा ही जबाबदारी स्वप्नील चांदेकर व मानसी जोशी यांनी सांभाळली, तर नृत्याविष्कार सादरीकरणात राधा थोरात, आदिती शिंदे, स्वरा जोशी, अंजना जहागिरदार, साक्षी राणे, देविका दळवी, भाग्यश्री थोरात, दिपाली शिंदे, गायत्री जहागीदार, जयराज ढोमसे, शिवाजी शिंदे, विनोद कोरी, श्रुती म्हात्रे, श्रेया दीक्षित, अक्षया कांबळे, संजय गावडे, विजय वगळ व गुरु श्रीमती स्मिता मोरे यांचा सहभाग होता.
गणेश मंदिर संस्थानचे कार्यवाह श्री प्रविण दुधे, विश्वस्त श्रीमती गौरीताई कुंटे व सांस्कृतिक सदस्या श्रीमती दिपाली काळे यांनी संस्थानच्या वतीने नृत्यालयाच्या संचालिका स्मिता मोरे, शिवाजी शिंदे, विनोद कोरी, इंग्रजीत मोरे यांना सन्मानित करून सर्व सहभागी कलावंतांचे कौतुक करून त्यांना गौरवित केले.


.jpeg)





0 टिप्पण्या