लोककवी सीताराम नरके संमेलनाध्यक्ष पदी निवड.

 


लोककवी सीताराम नरके संमेलनाध्यक्ष पदी निवड.

पुणे 

येथील साहित्यिक, लेखक कविवर्य  गीतकार अभिनेता लोककवी सीताराम नरके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरीतळेगाव ढमढेरे गावाचे सुपुत्र यांची  सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अंथुर्णे  संमेलनात साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र संमेलन कार्याध्यक्ष -रानकवी जगदीप वनशिव ,संस्थापक अध्यक्ष- विजय गायकवाड यांनी लोककवी सीताराम नरके यांना निवडपत्र सुपुर्त केले आहे. वळणावरती ओढ मातीची गंध मातीचा विचारांचा पाणवठा हे कवितासंग्रह चारोळी संग्रह शतपावली  फक्त तुझ्यासाठी परतीच्या वाटेवर बालकविता संग्रह कोल्ह्याचं दुकान पोथी नाथ महाराज चरित्र असे साहित्य प्रकाशित असून महाराष्ट्रातील अनेक साहित्य संमेलने कविसंमेलनासाठी अध्यक्ष पदी विराजमान असतात

हरहुन्नरी कलाकार असून त्यांनी चित्रपट पुस्तक बंद लघुचित्रपट ऑनलाईन मॅरेज नाटय क्षेत्रात कार्यरत आहेत तीन चोक तेरा बीजदाता सम्राट अशोक मी बाजीगर  असे चित्रपट नाट्य साहित्य कलेचा सांस्कृतिक वारसा जपत आहेत अशी बहुगुणी असणारे लोककवी सीताराम नरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली 

इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील संत तुकाराम महाराज पालखी तळ या ठिकाणी रविवार, दिनांक २० ऑगस्ट ,२०२३ रोजी कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व मराठी साहित्य संस्कृती कला विकास परिषद अंथुर्णे आयोजित 'सातवे संत तुकाराम महाराज ,मराठी ग्रामीण साहित्य संमेलन' अंथुर्णे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी साहित्य, नाट्य ,चित्रपट, कला,पत्रकारिता,सामाजिक शैक्षणिक  कार्यात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते  पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. एक दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी उद्घाटक सोहळा पुरस्कार वितरण सोहळा गझल मुशायऱा कविसंमेलन असे कार्यक्रम होणार आहेत निमंत्रक उद्घाटक आमदार दत्ता मामा भरणे( माजी पालकमंत्री सोलापूर),प्रमुख पाहुणे मेघराज राजे भोसले,(अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ),ज्येष्ठ कविवर्य 

वसंतराव पाटील (जलदगती हायकोर्ट, माझगाव न्यायाधीश),श्रीमंत आकळे साहेब (सहाय्यक पोलीस आयुक्त परिवहन विभाग,पुणे),सिने अभिनेता  बाबा गायकवाड घुंगरू चित्रपट ,प्रा. डॉ.संदीप सांगळे सर (सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ- मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष) 

संमेलनाचे अध्यक्ष लोककवी सिताराम नरके( माजी पोलीस अधिकारी राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी),बाळासाहेब गिरी (गझलकार),अशोक जाधव(माजी जिल्हा आधिकारी),लक्ष्मण शिंदे (वनविभाग मुख्यालय लेखापाल पुणे) ,जयश्री सोनवणे(उद्घाटन सोहळा,वृत्तनिवेदिका), प्रा . कवियत्री पत्रकार रूपाली अवचरे  पुरस्कार वितरण सोहळा

प्रसिद्ध प्रमुख कवी पत्रकार प्रमोद सूर्यवंशी निवेदिका संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड व संमेलनाचे कार्याध्यक्ष कविसंमेलन निवेदक रानकवी जगदीप वनशिव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत कवी कवियत्री यांनी उपस्थित राहून साहित्य संमेलनात येवू आपली हजेरी लावावी असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या