डॉ. सुनील पवार कमी शब्दात भरपुर व्यक्त होणारा मित्र...
सिझर न झालेल्या कविता संग्रहावर संत चोखामेळा नामकरणाचे शिल्पकार प्रा. कमलेश खिल्लारे यांची प्रतिक्रिया...फोटोत स्वाभिमानीचे नेते तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर साहेब तथा सामाजिक कार्यकर्ते मा. प्रदीपदादा हिवाळे.
कवीची एक विशेषता असते जे मनाला जाणवलं,भावलं,ते व्यक्त करणं...थोडक्यात ते तुमचं रिफ्लेक्शन असलं पाहिजे..सुनीलजी वेदनेशी खेळत..दु:खाशी नातं सांगत..परिस्थीतीचा बाऊ न करता.. स्वतःला उलगडत आपल्या कवितेतून बोलते झाले... परिस्थितीने दिलेली जखम दाखवताना ते लाजले नाहीत हे विशेष.सुनीलजी आपली प्रत्येक कविता समाजातील चांगलं वाईट यावर परखडपणे भाष्य करणारी आहे...
प्रार्थना कवितेत ..प्रार्थना सर्वसमावेशक वाटते..ती दीनदुबळ्यांना आनंद द्या.. शिकणा-याला लेखनी पाटी..आणि मुलीची होणारी भ्रूण हत्या पाहता.. एक बेटी द्या...जगणा-याला आधाराची काठी द्या अशी माणूसपणाची शिकवण देणारी प्रार्थना कवी करताना दिसतो....
माय कवितेत मायचं घरासाठी, मुलासाठी जगणं सोसणं खूप चांगल्या पध्दतीने उलगडून दाखवलं आहे...बुध्द शरण गच्छामि कवितेमध्ये..बुध्दाचे तत्वज्ञान सांगत..अंगुलीमाल समाजात वाढत आहेत. त्यांना माणूस बनवूया ही माणूसपणाची हाक देताना ते वाईटाच्या विरोधात उभे ठाकतात.आत्महत्या या कवितेत, लाचार मुखवटे..बेगडी नाते उलगडून दाखवताना ..ज्ञानाचं आणि जातीचं आर्थिक गणित मांडत.. गुणपत्रिका जाळली नसती तर आत्महत्या केली असती.हे जळ जळीत सत्य बिनधास्तपणे सांगताना घाबरत नाहीत. साहित्याची वारी या कवितेत, साहित्य क्षेत्रातील चमको गिरी परखडपणे त्यांनी मांडली आहे. पुरस्कार कसे मिळतात..आईवडीलांवर लिहून मोठे झालेले साहित्यिक स्वतःच्या आयुष्यात मात्र त्यांना विचारत नाही हे सत्य ही त्यांनी अधोरेखित केले आहे.
वांझोटा संताप मध्ये..अन्याय अत्याचारा वर बोलणारेच भाषणानंतर मदिरा आणि सौदर्याचा उपभोग घेतात तेव्हा, आपले रक्त तापायला नाही तर उकळायला हवे ही विद्रोहाची भाषा ते वापरतात. 'सिझर न झालेल्या कविता' या नावातच खूप मोठा अर्थ दडलेला आहे.. उसन्या कळा कामाच्या नसतात कारण घामावर लिहिण्यासाठी पंख्याच्या खाली बसून नाही तर उन्हात जावं लागेल हे सत्य तुम्ही सांगता...
सुनीलजी संत चोखामेळा यांनी समाजाचे दु:ख वेशीवर मांडत विद्रोह केला..तसचं काहीसं तुमचं झालं.. दुखणं पद,प्रतिष्ठा, ज्ञान कसलाही विचार न करता...आहे तसं...व्यक्त झालात आणि सकारात्मकतेची वाट सोडली नाही...यशवंत मनोहर..श्रीपाल सबनीस या साहित्याच्या क्षेत्रातील मैलाच दगड असलेली सन्माननीय आपल्या पुस्तकात व्यक्त होतात..बाकी आम्ही सर्व सामान्य शुभेच्छा देणारे...
मंगलमय शुभेच्छासह...
प्रा.कमलेश खिल्लारे 🌹

0 टिप्पण्या